Advertisement

सेमी इंग्लिश विषयावर उपयुक्त ग्रंथ


सेमी इंग्लिश विषयावर उपयुक्त ग्रंथ
SHARES

शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान यांच्या वतीने सेमी इंग्लिश या विषयावर शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर ठरेल असा उपयुक्त ग्रंथ तयार करण्याच काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.


शालेय उपक्रमांचा समावेश

सध्या इंग्रजी शाळांचे फॅड खुप वाढल असून मराठी किंवा सेमी इंग्रजी शिकवणाऱ्या शाळांकडे पालक पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे पालकांना सेमी इंग्रजीबाबत ज्ञान मिळण्यासाठी आणि सेमी इंग्रजी शिकवणाऱ्या शाळांच्या सक्षमीकरणाचा भाग हा ग्रंथ तयार करण्यात येणार आहे. त्या ग्रंथात सेमी इंग्रजी माध्यमाच्या विविध शालेय उपक्रमांचा समावेश करण्यात येणार आहे. तसंच राज्यात सेमी इंग्रजी शिकवणारे शिक्षक, तज्ज्ञ मंडळीचे अनुभवही त्यात असणार आहेत.


अनुभव लेख 'येथे' पाठवा

सेमी इंग्रजीबाबत अशाप्रकारे उपयुक्त ग्रंथ बनवण्यात येणार असून प्राचार्यांनी शाळेत राबवलेले उपक्रम, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, त्यातून विद्यार्थ्यांची झालेली प्रगती तसंच भविष्यात सेमी इंग्रजीचा त्या विद्यार्थ्यांना झालेला फायदा याबाबत तुम्हाला तुमचे अनुभवही मांडता येणार आहे. त्यासाठी तुमचे अनुभव लेख येत्या पंधरा दिवसात semienglish5@gmail.com पाठवता येऊ शकतात. तसचं यातील काही निवडक लेखांना प्रसिद्धीही देण्यात येणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा