Advertisement

मुंबई विद्यापीठात भरतोय योगाचा तास

कॉलेज स्तरावरील जवळपास २० हजार विद्यार्थ्यांना योगा इंर्टनचं ट्रेनिंग देण्यासाठी मुंबई विद्यापीठ आणि कॉलेजांमध्ये विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. कैवल्यधाम आणि हैदराबाद नॅशनल कॉलेजिएट बोर्ड यांच्यावतीने सुरू असलेल्या या मोहिमेअतंर्गत शनिवारी विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथ विशेष योग प्रशिक्षण शिबिराचा वर्ग भरवण्यात आला होता.

मुंबई विद्यापीठात भरतोय योगाचा तास
SHARES

विद्यार्थ्यांना योगाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि कॉलेज स्तरावरील जवळपास २० हजार विद्यार्थ्यांना योगा इंर्टनचं ट्रेनिंग देण्यासाठी मुंबई विद्यापीठ आणि कॉलेजांमध्ये विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. कैवल्यधाम आणि हैदराबाद नॅशनल कॉलेजिएट बोर्ड यांच्यावतीने सुरू असलेल्या या मोहिमेअतंर्गत शनिवारी विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथ विशेष योग प्रशिक्षण शिबिराचा वर्ग भरवण्यात आला होता. यावेळी विद्यार्थी आणि प्राध्यपक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


योग मोहीम कधीपर्यंत?

मुंबई विद्यापीठ आणि कैवल्यधाम संस्थेतर्फे १५ जूनापासून ही मोहीम सुरू केली. ही मोहीम येत्या २१ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे येत्या २१ जूनला जागतिक योगा दिन आहे. वांद्रे येथील नॅशनल कॉलेजमध्ये या मोहिमेचा शुभारंभ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पेडणेकर यांच्यासह नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. दिनेश पेजवानी, कैवल्यधामचे सुबोध तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी एकूण ५०० विद्यार्थी आणि ७५ शिक्षकांनी यात भाग घेतला होता.

तज्ज्ञांकडून योगाचे धडे

शनिवारी विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील क्रीडा संकुलात विशेष प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यात विद्यापीठ आणि एनएसएस विभागातील सुमारे ३०० जणांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना कैवल्यधाम संस्थेतील तज्ज्ञांकडून योगचे धडे देण्यात आले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा