Advertisement

प्राणीशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यायी संशोधनासह अतिरिक्त क्रेडिट


प्राणीशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यायी संशोधनासह अतिरिक्त क्रेडिट
SHARES

प्राणीशास्त्र विषयातील पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी विद्यापीठाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता पाचव्या आणि सहाव्या सत्रातील विद्यार्थ्यांना पर्यायी संशोधनाची संधी मिळणार असून त्यासाठी दोन क्रेडिटही बहाल करण्यात येणार आहेत. या अभ्यासक्रमाच्या समितीचे निमंत्रक प्रा. विनायक दळवी यांच्या संकल्पनेतून या अभिनव प्रयोगाला सुरुवात होत आहे.


अतिरिक्त क्रेडिटचीही सुविधा

गेल्या वर्षी प्राणीशास्त्र विषयाच्या पाचव्या आणि सहाव्या सत्रातील विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्प अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर याबाबत विद्यार्थी आणि शिक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.


विद्यार्थ्यांना मोठा फायदा

दरम्यान, यामुळे विद्यार्थ्यांना पर्यायी संशोधन प्रकल्पावर काम करता येणार आहे. तसेच यासाठी कोणत्याही संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांची, औद्योगिक प्रकल्पातील विशेषज्ञांची मदत घेण्याचे स्वातंत्र्यही विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. परंतु, हे अतिरिक्त क्रेडिट विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवीच्या गुणपत्रकांमध्ये नमूद केले जाणार नसून त्यांना त्याबाबतचे वेगळे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अभ्यासजगतामधील संशोधन वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.


डॉ. वासंती कच्छी, प्राचार्या, प्राणीशास्त्र अभ्यासमंडळ



हेही वाचा

एलएलएमच्या गोंधळाला 'हेच' जबाबदार!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा