• रहस्याचा एक नवा थरार 'हंड्रेड डेज'
  • रहस्याचा एक नवा थरार 'हंड्रेड डेज'
SHARE

मुंबई - कधी-कधी एखादी व्यक्ती एखादं रहस्य स्वतःजवळ बाळगून असते. आणि कधी ती व्यक्ती स्वतःच एक रहस्य असते. अशाच एका रहस्याचा उलगडा घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची गोष्ट हंड्रेड डेज या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या मालिकेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही मालिका शंभर भागांचीच आहे. शंभर दिवसात उलगडणा-या रहस्याचा उत्कंठावर्धक प्रवास या मालिकेतून बघायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीमधील दोन लोकप्रिय कलाकार म्हणजेच तेजस्विनी पंडित आणि आदिनाथ कोठारे या मालिकेत मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत. याशिवाय मालिकेत रमेश भाटकर, अर्चना निपाणकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या २४ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवारपर्यंत रात्री १०.३० वा. झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या