Advertisement

व्ही. शांताराम यांना गुगल डूडलकडून मानवंदना


व्ही. शांताराम यांना गुगल डूडलकडून मानवंदना
SHARES

भारतीय चित्रपटसृष्टीला दर्जेदार मराठी आणि हिंदी चित्रपट देणारे पितामह व्ही. शांताराम यांची आज ११६वी जयंती आहे. व्ही शांताराम यांनी चित्रपटसृष्टीला अनेक दमदार चित्रपट दिले. 'दो आँखें बारह हाथ', 'झनक झनक पायल बाजे', 'सेहरा', 'गीत गाया पथ्थरों ने', 'पिंजरा', 'नवरंग', 'झुंज' 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रम्हचारी' असे एकाहून एक उत्तम हिंदी आणि मराठी चित्रपट त्यांनी दिले. त्यांच्या जयंती निमित्त गुगलनं खास डूडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे.

गुगलनं तयार केलेल्या डूडलमध्ये व्ही. शांताराम यांचा फोटो दाखवण्यात आला आहे. त्यांच्या फोटोसमोरच चित्रपटाची रिळ आणि कॅमेरा दाखवण्यात आला आहे. बाजूला हातात डफ घेतलेला शाहीर, दो आँखे बारा हाथ आणि नवरंग चित्रपटातील चित्र रेखाटलं आहे.


सौजन्य


व्ही. शांताराम यांची कारकीर्द

१९ नोव्हेंबर १९൦१ साली कोल्हापूरमध्ये व्ही शांताराम यांचा जन्म झाला. बापू या नावानं देखील ते ओळखले जायचे. बापूंच्या कारकिर्दीला सुरुवात झाली ती कोल्हापूर इथल्या बाबुराव पेंटर यांच्या मालकीच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीपासून. कंपनीत असेल ते काम बापू करायचे. १९२१ साली 'सुरेखा हरण' या मूकपटात त्यांनी छोटीशी भूमिका साकारली होती. १९२५ साली त्यांनी 'सावकारी पाश' या चित्रपटात एका तरूण शेतकऱ्याची भूमिका केला होती. १९२७ साली त्यांनी 'नेताजी पालकर' हा पहिला मूकपट दिग्दर्शित केला.


व्ही. शांताराम यांनी स्टुडिओला राजकमल नाव का दिले?

व्ही. शांताराम यांनी प्रभात चित्र फिल्म कंपनीतून बाहेर पडून परेल इथे महात्मा गांधी रुग्णालयाजवळ 'राजकमल' स्टुडिओची उभारणी केली. व्ही शांताराम यांच्या वडिलांचं नाव राजाराम आणि आईचं नाव कमल होतं. या दोघांच्या नावातून व्ही. शांताराम यांनी स्टुडिओचे नाव 'राजकमल' ठेवलं. याच स्टुडिओत व्ही शांताराम यांचा पहिला चित्रपट 'शकुंतला' चित्रीत करण्यात आला. १९६൦ नंतर इतर निर्मिती संस्थांना चित्रीकरणाची संधी देण्यात आली.


सौजन्य


चार्ली चॅपलिन यांच्याकडून बापूंचे कौतुक

चार्ली चॅप्लीन यांनी शांताराम यांच्या दिग्दर्शनाचं कौतुक केलं होतं. आचार्य प्र.के. अत्रेंनी शांताराम बापूंना 'चित्रपती' ही पदवी दिली. १९८५ साली शांताराम यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार' प्रदान करण्यात आला. १९९२ साली भारत सरकारनं त्यांना 'पद्मविभूषण' पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आलं.



हेही वाचा

'पद्मावती' चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर?

विद्या बालन स्पेशल...'तुम्हारी सुलु'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा