24 वर्षानंतर आमिरचं गुपित उघड

 Pali Hill
24 वर्षानंतर आमिरचं गुपित उघड
24 वर्षानंतर आमिरचं गुपित उघड
24 वर्षानंतर आमिरचं गुपित उघड
See all
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - जो जीता वही सिकंदर या सिनेमातील आमिर खानच्या अभिनयाची जादू आजही कायम आहे. पण या सिनेमाबद्दल आमिरला फिल्मफेयर अवॉर्ड न मिळाल्यानं तो प्रचंड नाराज झाला होता. याचं कारण म्हणजे कमल हसन. आमिरचा चुलत भाऊ मन्सूर खाननं 24 वर्षानंतर हे गुपित उघड केलंय. मन्सूर आणि 'जो जिता वही सिकंदर'च्या सर्व कलाकारांनी शनिवारी मुंबईत 'मामि' फेस्टिव्हलदरम्यान विशेष चर्चेत भाग घेतला होता. मन्सूर चित्रपटाचे दिग्दर्शक होते तर आमिरचे काका नासिर हुसेन हे निर्माते. मंसूर यांनी सांगितलं की, अनिल कपूरचा बेटा हा चित्रपटही त्याच वेळी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्म फेयर अवॉर्ड अनिल कपूरला मिळाला होता. त्यामुळं आमिरला खूप दु:ख झालं होतं. त्याला वाटलं की, जणू त्याच्यावर अन्यायच झालाय. मन्सूर यांच्या मते तेव्हा अवॉर्ड देण्यासाठी कमल हसन यांना मंचावर आमंत्रित करण्यात आलं होतं. विजेता म्हणून अनिल कपूरचं नाव असताना कमल हसन यांनी उत्साहाच्या भरात चुकून आमिरचं नाव घेतलं आणि त्यानंतर आमिरनं फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्याकडे पाठ फिरवली.

Loading Comments