Advertisement

अभिजीत बिचुकले गाजवणार हिंदी 'बिग बॉस', एन्ट्रीलाच घेतला पंगा

बिग बॉस मराठी २ मध्ये बिचुकले सहभागी झाला होता. त्याचा मराठी बिग बॉसमधील प्रवास फार काळ नव्हता. पण त्याची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती.

अभिजीत बिचुकले गाजवणार हिंदी 'बिग बॉस', एन्ट्रीलाच घेतला पंगा
SHARES

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चे यंदाचे हे १५ वे पर्व सुरू आहे. हा शो सुरु झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

नुकतीच ‘बिग बॉस’च्या घरात ३ स्पर्धकांची एण्ट्री झाली आहे. अभिनेत्री रश्मि देसाई, देवोलीना भट्टाचार्जी आणि अभिजीत बिचुकले हे तीन स्पर्धक आहेत.

अभिजीत बिचुकले ‘बिग बॉस मराठी’मध्ये होता. शनिवारी ‘वीकेंड का वार स्पेशल’ला आलेले अभिनेते महेश मांजरेकर यांनी बॉलिवूडचा भाईजान आणि ‘बिग बॉस १५’चा सूत्रसंचालक सलमान खानला अभिजीत विषयी सांगितले.

महेशजींनी सांगितलं की, अभिजीतनं ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा पूर्ण नकाशा बदलून टाकला होता. कदाचित बिग बॉस १५ मध्येही तो हेच करेल.

प्रोमोममध्ये बिचकुले स्वत:ची ओळख करून देताना म्हणतो की, आय अम अ रायटर, आय अम अ सिंगर, आय अम अ कम्पोझिशन मेकर, आय वाँट टू बिकम... त्यावर मांजरेकर म्हणाले यू वाँच टू बिकम प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया? असं म्हटलं. तर बिचुकले यांनी यास म्हटलं.

त्यासोबतच एन्ट्रीच्या वेळीच त्यांचं आणि देबोलेना भट्टाचार्यामध्ये वाद झाल्याचं देखील पाहायला मिळालं. बिचुकले म्हणाला की, नेहा भसीमनं कोणाला तरी मारल्याचं कळालं. अशावेळी माझं डोकं जरा फिरतं. अशांमध्ये संस्कार थोडे कमी असतात.

संस्काराच्या मुद्द्यावरून देबोलेना म्हणाली की, तुम्ही अशा जागी कशाला आलात जिथे संस्कार थोडे कमी असतात. त्यावर बिचुकले म्हणाले की, सुधारायलाच आलोय.  

बिग बॉस मराठी २ मध्ये बिचुकले सहभागी झाला होता. त्याचा मराठी बिग बॉसमधील प्रवास फार काळ नव्हता. पण त्याची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती. एका प्रकरणात सातारा कोर्टानं त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. त्यामुळे बिग बॉसच्या सेटवर येऊन त्याला अटक करण्यात आली होती.  हेही वाचा

‘बिग बॉस मराठी२’ चा विजेता शिव ठाकरेच्या गाडीचा भीषण अपघात!

बिग बॉस मराठी ३ मधून स्नेहा वाघ बाहेर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा