Advertisement

मराठी जोडीचा हिंदीवर 'हाय जॅक'


मराठी जोडीचा हिंदीवर 'हाय जॅक'
SHARES

लवकरच 'हाय जॅक' या हिंदी चित्रपटातून एक मराठी जोडी झळकणार आहे. ही जोडी आहे अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी यांची. हे दोघेही 'हाय जॅक'मध्ये पाहूणे कलाकार म्हणून झळकणार आहेत. अमेयने याआधी हिंदी चित्रपटात काम केलं आहे, मात्र निपूणचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे.

निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ ही जोडी मराठी इंडस्ट्रीत सर्वांनाच परिचयाची आहे. आकर्ष खुराना या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. हे दोघे पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात काम करणारे सगळे कलाकार नाटक आणि वेबसिरीजमध्ये काम करणारे आहेत.


अमेय, निपुणबद्दल...

तरुणींचा लाडका कलाकार अमेय वाघ याने मुरांबा, फास्टर फेणे, शटर यांसारख्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अमेयने बालनाट्य, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामधून आपल्या करिअरची सुरुवात केली. नंतर त्याने अनेक व्यवयासिक नाटकं करत रंगभुमी गाजवली. सध्या अमेयचे अमर फोटो स्टुडीओ हे नाटक चांगलंत गाजत आहे. नाटक, चित्रपटाबरोबरच दिल दोस्ती दुनीयादारी या मालिकेतून अमेय घराघरात पोहचला. तर निपुणने 'बाप जन्म' या चित्रपटासह अनेक नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे. सध्या हे दोघं कास्टींग काऊच या वेब शोचं अॅँकरिंग करत आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा