Advertisement

'संगीत मानापमान' हे अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर, सुबोध भावेंचं दिग्दर्शन

अभिनेता सुबोध भावे 'संगीत मानापमान' हे अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर 'मानापमान' चित्रपटाद्वारे सादर करणार आहेत.

'संगीत मानापमान' हे अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर, सुबोध भावेंचं दिग्दर्शन
SHARES

अभिनेता सुबोध भावे 'संगीत मानापमान' हे अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर 'मानापमान' चित्रपटाद्वारे सादर करणार आहेत. पुढील वर्षी दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

नुकतंच 'मानापमान' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपटाचं टीजर पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. सुनील फडतरे चित्रपटाची निर्मिती करत आहेत. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी संगीत मानापमान नाटक लिहिलं होतं.

तर शिरीष गोपाळ देशपांडे या चित्रपटाची पटकथा लिहित आहेत. नाटकाचं संगीत गोविंदराव टेंबे यांनी केलं होतं. तर चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन शंकर-एहसान-लॉय करणार आहेत.

नमन नटवरा सारखी नांदी या नाटकानं दिली होती. तर नाही मी बोलत नाथा, चंद्रिका ही जणू, शुरा मी वंदिले, युवतीमना दारुण रण अशी उत्तमोत्तम पदं नाटकात होती. ही पदं आजही तितकीच लोकप्रिय आहेत. १९११ मध्ये हे नाटक रंगमंचावर आलं होतं. त्यात बालगंधर्वांची प्रमुख भूमिका होती. आता चित्रपट रुपात हे नाटक येत असताना कोण कलाकार असतील याचं कुतुहल निर्माण झालं आहे.

जागतिक पातळीवर ज्याप्रमाणे "कट्यार काळजात घुसली" चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती त्याप्रमाणेच "मानापमान" या चित्रपटाला देखील पसंती मिळेल, अशी भावना सुबोध भावे यांनी व्यक्त केली.



हेही वाचा

मॉस्को इंटरनॅशनल फिल्म 2021चा बेस्ट फॉरेन फीचर अवॉर्ड ‘या’ चित्रपटाच्या नावे

कार्तिक आर्यनचा 'धमाका', OTT प्लॅटफॉर्मवर अक्षय, वरूणला टाकलं मागे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा