Advertisement

रणवीरच्या अमृतमयी शुभेच्छा

अमृता आणि रणवीरची मैत्रीही खास आहे. अमृताने आतापर्यंत केलेले सिनेमे असोत, वा डान्स परफॉर्मन्स, रणवीरची सकारात्मक प्रतिक्रिया तिला असतेच ! त्यामुळे, आपल्या लाडक्या मैत्रिणीचा वाढदिवस विसरेल, तर तो रणवीर कसला?

रणवीरच्या अमृतमयी शुभेच्छा
SHARES

'सिम्बा' चित्रपटासोबतच दीपिका पदुकोणसोबत विवाहबद्ध झाल्याने अभिनेता रणवीर सिंग मागील काही दिवसांपासून लाइमलाईटमध्ये आहे. 'सिम्बा'च्या सेटवरून मराठमोळी अभिनेत्री तेजस्वीनी पंडीतला शुभसंदेश देणाऱ्या रणवीरने आता अमृता खानविलकरला तिच्या वाढदिवसानिमित्त अमृतमयी शुभेच्छा दिल्या आहेत.


लाडक्या मैत्रिणीचा वाढदिवस 

बॉलीवूडचा 'बाजीराव' रणवीर सिंग पडद्यावर जितका प्रसिद्ध आहे, अगदी तितकाच पडद्यामागेही आहे. त्याच्या मनमोकळ्या स्वभावावर अनेकजण फिदा असून, मराठीतील स्टार अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील त्याला अपवाद नाही. अमृता आणि रणवीरची मैत्रीही खास आहे. अमृताने आतापर्यंत केलेले सिनेमे असोत, वा डान्स परफॉर्मन्स, रणवीरची सकारात्मक प्रतिक्रिया तिला असतेच ! त्यामुळे, आपल्या लाडक्या मैत्रिणीचा वाढदिवस विसरेल, तर तो रणवीर कसला? काही दिवसांपूर्वीच संपन्न झालेल्या त्याच्या शाही विवाहसोहळ्यात व्यग्र असूनही, त्याने अमृताचा वाढदिवस विस्मृतीत जाऊ दिला नाही.


इन्स्टाग्रामवर शुभेच्छा

अमृताला भेटणं जरी शक्य नसलं तरी, त्याने तिच्या इन्स्टाग्रामवर वाढदिवसाच्या शुभेच्छा आवर्जून पाठवल्या आहेत. त्याने अमृताला 'हॅलो गॉर्जिअस !!!, हॅप्पी बर्थ डे !!!.' असा इन्स्टा संदेश केला असून, 'तू एक खास व्यक्ती आहेस, या संपूर्ण जगाचं अमाप प्रेम आणि भरपूर आशीर्वाद तुला मिळो. तसंच हे वर्ष तुझ्यासाठी सर्वोत्तम ठरो. माझ्याकडून तुला खूप खूप प्रेम' अशा शुभेच्छा रणवीरने अमृताला दिल्या आहेत. अमृतानेही त्याला वैवाहिक आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा देत, आभार मानले आहेत.हेही वाचा - 

गायक बनून जगण्याचा अर्थ उलगडणार भूषण प्रधान

रावाचा रंक बनवणारा 'पॅटर्न'
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा