Coronavirus cases in Maharashtra: 1082Mumbai: 642Pune: 130Navi Mumbai: 28Islampur Sangli: 26Kalyan-Dombivali: 25Ahmednagar: 25Thane: 24Nagpur: 19Pimpri Chinchwad: 17Aurangabad: 13Vasai-Virar: 10Latur: 8Buldhana: 7Satara: 6Panvel: 6Pune Gramin: 4Usmanabad: 4Yavatmal: 3Ratnagiri: 3Palghar: 3Mira Road-Bhaynder: 3Kolhapur: 2Jalgoan: 2Nashik: 2Ulhasnagar: 1Gondia: 1Washim: 1Amaravati: 1Hingoli: 1Jalna: 1Total Deaths: 64Total Discharged: 79BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

गायक बनून जगण्याचा अर्थ उलगडणार भूषण प्रधान

गाण्याची आवड असणाऱ्या एका छोट्या खेड्यातून आलेल्या मल्हार नावाच्या युवकाचा प्रसिद्ध गायक होण्यापर्यंतचा प्रवास या संगीतमय चित्रपटातून उलगडणार आहे. भूषण प्रधानने ही व्यक्तिरेखा साकारली असून, या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं काम करण्याची संधी मिळाल्याने आनंदी असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे.

गायक बनून जगण्याचा अर्थ उलगडणार भूषण प्रधान
SHARE

छोट्या पडद्याकडून मोठ्या पडद्याकडे झेपावल्यावर नेहमीच काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याच्या प्रयत्नात असलेला अभिनेता भूषण प्रधान पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रे राया'मध्ये कोच बनल्यानंतर ७ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या 'तू तिथे असावे' या चित्रपटात तो गायक बनून जगण्याचा अर्थ उलगडणार आहे.


स्वप्नपूर्तीचा प्रवास

कलेप्रती निष्ठा आणि समर्पीत भाव असेल तरच तो कलाकार स्वतःच ध्येय साध्य करू शकतो, पण त्याला जोड लागते अथक प्रयत्न, जिद्द आणि आत्मविश्वासाची. अर्थात स्वप्नपूर्तीचा हा प्रवास सोपा कधीच नसतो.  आत्मविश्वासाच्या बळावर भावनांची निरगाठ सोडवत स्वप्नं कशी साकार करायची हे सांगू पाहणारा चित्रपट आहे  'तू तिथे असावे'.


गायक होण्यापर्यंतचा प्रवास

गाण्याची आवड असणाऱ्या एका छोट्या खेड्यातून आलेल्या मल्हार नावाच्या युवकाचा प्रसिद्ध गायक होण्यापर्यंतचा प्रवास या संगीतमय चित्रपटातून उलगडणार आहे. भूषण प्रधानने ही व्यक्तिरेखा साकारली असून, या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं काम करण्याची संधी मिळाल्याने आनंदी असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे. त्याच्या जोडीला आहे पल्लवी पाटील. याशिवाय मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, मास्टर तेजस पाटील, श्रीकांत वट्टमवार, अभिलाषा पाटील, विशाखा घुबे हे कलाकारही या चित्रपटात आहेत.


साजेशी गीतं

'तू तिथे असावे' या चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत. चित्रपटाची कथा आणि पटकथा आशिष विरकर यांनी लिहिली आहे. संवाद आशिष विरकर आणि दिपक अंगेवार यांचे आहेत. आदर्श शिंदे, नेहा राजपाल, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, जसराज जोशी, धनश्री बुरबुरे या गायकांनी या चित्रपटातली गाणी गायली आहेत. मंदार चोळकर, डॉ. श्रीकृष्ण राऊत, पार्वस जाधव यांनी कथेला साजेशी गीतं लिहिली आहेत. 


नात्यांची सांगड 

दिनेश अर्जुना यांनी प्रसंगानुरूप चाली देत गीतं संगीतबध्द केली आहेत. पार्श्वसंगीत समीर फातर्फेकर यांचं आहे. नात्यांची सुरेख सांगड घालत जगण्याचा अर्थ उलगडून दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे.हेही वाचा - 

रावाचा रंक बनवणारा 'पॅटर्न'

आयुष्य समृद्ध करणारी 'सायकल' छोट्या पडद्यावर!
संबंधित विषय
संबंधित बातम्या