पहा कोजागिरीच्या रात्री ‘सिम्बा’च्या सेटवर काय घडलं?

‘सिम्बा’च्या सेटवर कोजागिरीच्या रात्री एका मोठ्या टेबलावर भला मोठा केक सजवण्यात आला होता. संपूर्ण टीम जल्लोष करण्यासाठी तयार होती. रोहितची एन्ट्री होताच ‘फर्ज’ चित्रपटातील ‘बार बार दिन ये आए...’ हे गाणं वाजवण्यात आलं आणि दुसऱ्या टोकाला असलेल्या रणवीर सिंगने जितेंद्रसारखं नृत्य करायला सुरुवात केली.

  • पहा कोजागिरीच्या रात्री ‘सिम्बा’च्या सेटवर काय घडलं?
SHARE

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री ‘सिम्बा’ चित्रपटाच्या सेटवर अभिनेता सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा आपल्या आयुष्यातील हा खूप मोठा क्षण असल्याची भावना व्यक्त करत सिद्धार्थने शीर्षक भूमिकेतील रणवीर सिंगसोबत डान्स केला.
धमाल, मस्ती करत वाढदिवस

मराठी चित्रपटांसोबतच ‘कॅामेडी सर्कस’ आणि ‘नच बलीए ८’ या रिअॅलिटी शोमध्ये चमकलेला सिद्धार्थ सध्या रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ या चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्यात व्यग्र आहे. ‘गोलमाल’ आणि ‘गोलमाल रिटर्न्स’ या चित्रपटानंतर ‘सिम्बा’च्या निमित्ताने सिद्धार्थला पुन्हा रोहितसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटाच्या सेटवरच संपूर्ण टीमसोबत धमाल, मस्ती करत सिद्धार्थने आपला वाढदिवस साजरा केला.


जितेंद्र स्टाईलमध्ये रणवीरचा डान्स

‘सिम्बा’च्या सेटवर कोजागिरीच्या रात्री एका मोठ्या टेबलावर भला मोठा केक सजवण्यात आला होता. संपूर्ण टीम जल्लोष करण्यासाठी तयार होती. रोहितची एन्ट्री होताच ‘फर्ज’ चित्रपटातील ‘बार बार दिन ये आए...’ हे गाणं वाजवण्यात आलं आणि दुसऱ्या टोकाला असलेल्या रणवीर सिंगने जितेंद्रसारखं नृत्य करायला सुरुवात केली. मधोमध उभ्या असलेल्या सिद्धार्थनेही त्याच तालावर डान्स करत रणवीरला साथ केली. फटाक्यांची आतषबाजी झाली. त्यानंतर उजव्या बाजूला रणवीर आणि डाव्या बाजूला रोहितला घेऊन सिद्धार्थने केक कापला.


आयुष्यातला मोठा क्षण

केक कापल्यानंतर मराठीमध्ये आपल्या भावना व्यक्त करत सिद्धार्थ म्हणाला की, हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आहे. रोहितसरांच्या फिल्ममध्ये काम करत आहे. रणवीरसारखा सुपरस्टार या चित्रपटात आहे आणि मी त्याचा पार्ट आहे. आय लव्ह यू रोहितसर. मी १३-१४ वर्षांपासून रोहितसरांसोबत काम करत आहे. खूप मस्त वाटत असल्याचंही सिद्धार्थ म्हणाला. सिद्धार्थच्या वाढदिवसासाठी आणलेला हा केक रणवीरला खूप आवडला. जाता जाता या केकचं तोंड भरून कौतुक करायला रणवीर विसरला नाही.हेही वाचा - 

‘मी शिवाजी पार्क’ आता जर्मनी, स्वीडन आणि अमेरिकेतही

#MeToo: तनुश्री लेस्बियन, माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा आरोप

नटखट भूमिकेत दिसणार सुबोध भावेचा कान्हा
संबंधित विषय
ताज्या बातम्या