सुमित उघडणार लागूंच्या अदाकारीचा ‘पिंजरा’

‘आणि... डॅा. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमातील डॅा. श्रीराम लागूंच्या रूपातील सुमितचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाच्या माध्यमातून रिव्हील करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये डोक्यावर गांधी टोपी, सदरा-जॅकेट, घारे डोळे, चष्मा, मिशी असा लागूंसारख्या गेटअपमधील सुमित दिसतो.

SHARE

सिनेमाच्या माध्यमातून इतिहास जेव्हा पुन्हा नव्या रूपात समोर येतो तेव्हा सर्वांचंच त्याकडे लक्ष लागलेलं असतं. मागील बऱ्याच वर्षांपासून अभिनेता सुबोध भावेने रुपेरी पडद्याच्या माध्यमातून पुन्हा इतिहासाची पानं उलगडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘आणि... डाॅ. काशिनाथ घाणेकर’ हा सिनेमा म्हणजे सुबोधच्या या प्रवासातील पुढचं पाऊल मानलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. या सिनेमात तो डाॅ. काशिनाथ घाणेकरांच्या भूमिकेत दिसणार असून, त्याच्या जोडीला अभिनेता सुमित राघवनने ज्येष्ठ अभिनेते डॅा. श्रीराम लागूंची भूमिका साकारली आहे.


घाणेकरांच्या जीवनप्रवासात लागूंची झलक

‘आणि... डॅा. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमातील डॅा. श्रीराम लागूंच्या रूपातील सुमितचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाच्या माध्यमातून रिव्हील करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये डोक्यावर गांधी टोपी, सदरा-जॅकेट, घारे डोळे, चष्मा, मिशी असा लागूंसारख्या गेटअपमधील सुमित दिसतो. पोस्टरच्या वरच्या बाजूला डाॅ. श्रीराम लागू असं लिहिलेलं असून, एका बाजूला पिंजरा त्याअर्थी लागूंचं हे रूप ‘पिंजरा’ सिनेमातील असल्याचं सहज लक्षात येतं. यावरून घाणेकरांच्या जीवनप्रवासात प्रेक्षकांना लागूंची झलक आणि त्यांचे घाणेकरांच्या कारकिर्दीतील संदर्भही पहायला मिळणार असल्याची जाणीव होते.


७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित

वायकॅाम १८ मोशन पिक्चर्सने श्री गणेश मार्केटिंग अॅड फिल्म्ससोबत या सिनेमाची निर्मिती केली असून, स्वतंत्रपणे प्रस्तुतीही केली आहे. अभिजीत देशपांडे यांनी या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. १९६० च्या दशकावर आधारीत असलेल्या ‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमामध्ये टाळ्यांच्या कडकडाटामध्ये जीवन जगलेल्या अभिनयाच्या सम्राटाचा उदय आणि अस्त पाहायला मिळेल. ७ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये नेहमीच भविष्याकडे दृष्टी ठेवून कोणतीही भूमिका बेधडकपणे साकारणाऱ्या लागूंची सुमितने साकारलेल्या भूमिकेवर कोणती प्रतिक्रिया मिळते ते पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.हेही वाचा -

सुबोध-श्रुतीच्या रोमँटिक साँगची मोहिनी

'हे' आहेत संजय जाधवच्या सिनेमातील 'लकी' कलाकार 

संबंधित विषय
ताज्या बातम्या