Advertisement

सुबोध-श्रुतीच्या रोमँटिक साँगची मोहिनी

सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शुभ लग्न सावधान’ या सिनेमातील रोमँटिक साँग नुकतंच सोशल नेटवर्किंग साईटवर लाँच करण्यात आलं. ‘हे वेड आहेस तू...’ असे या गाण्याचे बोल असून, सुबोध आणि श्रुतीची लव्ह केमिस्ट्री यात पहायला मिळते.

सुबोध-श्रुतीच्या रोमँटिक साँगची मोहिनी
SHARES

‘बंध नायलाॅनचे’ या सिनेमानंतर ‘शुभ लग्न सावधान’ या आगामी सिनेमासाठी सुबोध भावे आणि श्रुती मराठे ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. या सिनेमातील सुबोध-श्रुतीवर चित्रीत करण्यात आलेलं एक रोमँटिक साँग सध्या संगीतप्रेमींना मोहिनी घालत आहे.




‘हे वेड आहेस तू...’ 

पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित ‘शुभ लग्न सावधान’ हा सिनेमा १२ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमातील रोमँटिक साँग नुकतंच सोशल नेटवर्किंग साईटवर लाँच करण्यात आलं. ‘हे वेड आहेस तू...’ असे या गाण्याचे बोल असून, सुबोध आणि श्रुतीची लव्ह केमिस्ट्री यात पहायला मिळते. या गाण्यात दुबईचे बुर्ज अल अरब हे सप्ततारांकित हॉटेल दिसतं.


दुबईत चित्रीकरण

प्रेमीयुगुलांना आकर्षित करणारं हे गाणं मंदार चोळकरनं शब्दबद्ध केलं असून, चिनार आणि महेश यांनी संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याला हर्षवर्धन वावरे आणि अपेक्षा दांडेकर यांचा गोड आवाज लाभला आहे. विवाहसंस्थेवर भाष्य करणारा हा कौटुंबिक सिनेमा आहे. यात डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. दुबईतसह इगतपुरी येथे चित्रीत करण्यात आलेल्या या सिनेमासाठी अरुंधती दाते, श्रीनिवास जांभेकर, विद्या संदीप तुंगारे व तुषार कर्णिक यांनी निर्मिती सहाय्य केलं आहे.





हेही वाचा -

'हे' आहेत संजय जाधवच्या सिनेमातील 'लकी' कलाकार

विकीच्या हेअर स्टाईलचं तरुणाईला ‘याड लागलं’



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा