Advertisement

नेहा धुपियाने केलं गुपचुप लग्न


नेहा धुपियाने केलं गुपचुप लग्न
SHARES

बॉलिवूडची मसक्कली सोनम कपूर हिच्या लग्नाची चर्चा अजून संपलीही नाही, तोच तिकडे अभिनेत्री नेहा धुपियानेही गुपचुप लग्न केलं आहे. नेहा धुपियाने आपल्यापेक्षा दोन वर्ष लहान असलेल्या अंगद बेदीसोबत लग्न केलं आहे. अंगद बेदी हा नेहाचा जवळचा मित्र असून तो क्रिकेटर बिशन सिंग बेदी यांचा मुलगा आहे.


 नेहानेही सोनमप्रमाणेच शिख रितीरिवाजानुसार लग्न केलं. पण तिने कोणताही गाजावाजा न करता लग्न केलं. या गुपचुप लग्नाची खुशखबर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली.



‘मिस इंडिया’ झाल्यानंतर नेहाने ‘कयामत: सिटी अंडर थ्रेट’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने अनेक सिनेमांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. नुकतंच ती हिंदी मीडियम, जुली आणि तुम्हारी सुलूमध्ये विद्याबालनसोबत अभिनय केला होता.

अंगद बेदीने अनेक छोट्या छोट्या भूमिका साकारल्या आहेत. अमिताभ बच्चन-तापसी पन्नू यांच्यासोबत तो पिंक आणि डिअर जिंदगी या सिनेमात झळकला होता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा