… आणि अमृता गहिवरली!

अमृता नेहमीच वेळात वेळ काढत लहान मुलांमध्ये रमताना दिसली. 'सुपर डान्सर महाराष्ट्राचा' या रिअॅलिटी शो मधील मुलांची तर ती लाडकी 'अम्मू दीदी' बनली आहे. अशा या बच्चे कंपनीच्या लाडक्या अम्मू दिदीने यंदाचा ख्रिसमस विशेष मुलांसोबत साजरा केला.

  • … आणि अमृता गहिवरली!
  • … आणि अमृता गहिवरली!
SHARE

सध्या अमृता खानविलकर हे नाव सगळीकडे चांगलंच गाजत आहे. रसिकांचा लाडका अभिनेता रणवीर सिंगकडून सरप्राईज भेट मिळालेल्या अमृताने एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने यंदाचा ख्रिसमस साजरा केला.विशेष मुलांसोबत ख्रिसमस 

अमृता नेहमीच वेळात वेळ काढत लहान मुलांमध्ये रमताना दिसली. 'सुपर डान्सर महाराष्ट्राचा' या रिअॅलिटी शो मधील मुलांची तर ती लाडकी 'अम्मू दीदी' बनली आहे. अशा या बच्चे कंपनीच्या लाडक्या अम्मू दिदीने यंदाचा ख्रिसमस विशेष मुलांसोबत साजरा केला. ठाणे येथील जागृती पालक संस्थेच्या मुलांसोबत काही क्षण घालवत अमृताने त्यांचा आनंद द्विगुणीत केला. नाताळ सणाच्या निमित्ताने अमृताने मुलांना खास भेटवस्तूही दिल्या. मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी ती त्यांच्यासोबत काही खेळदेखील खेळली. 


मनमुराद आनंद 

मुलांनीही अमृतासोबत ख्रिसमस पार्टीचा मनमुराद आनंद लुटला. अमृताच्या स्वागतासाठी जागृती पालक संस्थेतील या विशेष मुलांचा खास नाचगाण्याचा कार्यक्रमदेखील तिथे आयोजित करण्यात आला होता. सामान्य मुलांप्रमाणेच या मुलांकडूनही मिळालेल्या अमाप प्रेमामुळे अमृता गहिवरली.


भरून पावले

आपल्या भावना शब्दांमध्ये व्यक्त करताना अमृता म्हणाली की, दरवर्षी मी वेगवेगळ्या एनजीओमधील लहान मुलांना जाऊन भेटते. त्यांचा सहवास मला आवडतो.  मात्र, इथे येऊन मी खरंच भरून पावले आहे. ही मुलं सामान्य मुलांसारखी नसली तरी खूप खास आहेत, ही मुलंही निरागस आणि भोळीभाबडी आहेत, त्यामुळे यांना इतरांहून वेगळं म्हणताच येणार नाही. या मुलांकडून जे प्रेम मिळालं ते न विसरण्याजोगं असल्याचंही अमृता म्हणाली.हेही वाचा - 

'सिंबा'च्या मागे ११ मराठमोळ्या कलाकारांची फौज

'ठाकरे' जुमानणार का सेन्सॅारचा आदेश?
संबंधित विषय
ताज्या बातम्या