Advertisement

लंडनमध्ये कंगनाचं चक्रासन


लंडनमध्ये कंगनाचं चक्रासन
SHARES

कधी एखाद्या आव्हानात्मक भूमिकेमुळं, तर कधी वादग्रस्त वक्तव्यामुळं चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतने लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय योगा डे साजरा केला.


योगाप्रती समर्पित भावना

मागील काही दिवसांपासून कंगना लंडन मुक्कामी आहे. तिथे ती ‘मेंटल है क्या’ या आगामी हिंदी सिनेमाचं चित्रीकरण करण्यात व्यस्त आहे. तिथंच तिनं योगा डे साजरा केला. आंतरराष्ट्रीय योगा डेचं औचित्य साधत लंडनमधील हाइड पार्कमध्ये योगा करतानाचे फोटो व व्हिडीओ इंस्टाग्राम फॅन क्लबच्या माध्यमातून कंगनाने आपल्या चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योगा डे २०१८ च्या निमित्ताने कंगना रणौतने योगाबाबतची समर्पित भावना व्यक्त केली आहे. तिचा हा फोटो सर्वांना योगाच्या माध्यमातून जीवनशैली सुधारण्यासाठी प्रोत्साहित करणारा आहे. या फोटोमध्ये ती अवघड असलेलं चक्रासन करताना दिसते.



हेही वाचा -

स्त्रियांच्या समस्येसाठी ‘पळापळ’ करणार प्रदीप पटवर्धन !

शर्मिष्ठा, मेघाला ‘बिग बॅास’मध्ये होणार शिक्षा !



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा