Advertisement

साक्षी तन्वरच्या घरी चिमुकलीचं आगमन

विजयादशमीला आपल्या घरी जणू लक्ष्मीचं आगमन झाल्याची भावना साक्षीनं व्यक्त केली आहे. दित्या हे देवी लक्ष्मीचं एक नाव असून जी भक्तांच्या सर्व प्रार्थना ऐकून त्यांना उत्तर देतं. असा या नावामागे अर्थ होतो.

साक्षी तन्वरच्या घरी चिमुकलीचं आगमन
SHARES

अभिनेत्री साक्षी तन्वरच्या घरी एका चिमुकलीचं आगमन झालं आहे. दसऱ्याच्या दिवशी साक्षीनं नऊ महिन्याच्या मुलीला दत्तक घेतलं असून तिचं नाव दित्या असं ठेवलं आहे. विशेष बाब म्हणजे साक्षीचं लग्न झालेल नाही. आतापर्यंत रवीना टंडन, सुश्मिता सेन, सनी लिओन, नीलम यांनीही मुली दत्तक घेतल्या असून आता त्या यादीत साक्षीचं नाव समाविष्ट झालं आहे.


लक्ष्मीचं आगमन

४५ वर्षीय साक्षी तन्वरनं मालिका ते चित्रपटातून आपल्या अभिनायांची खास छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. त्याचसोबतचं आपल्या खाजगी आयुष्यातील हा सुंदर क्षणही तिनं प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे. विजयादशमीला आपल्या घरी जणू लक्ष्मीचं आगमन झाल्याची भावना साक्षीनं व्यक्त केली आहे. दित्या हे देवी लक्ष्मीचं एक नाव असून जी भक्तांच्या सर्व प्रार्थना ऐकून त्यांना उत्तर देतं. असा या नावामागे अर्थ होतो. दित्याच्या घरातील आगमानमुळं केवळ तिचंच नाही तर तिच्या कुटुंबाचंही आयुष्य आनंदी झालं आहे. हे बाळ देवी लक्ष्मीचा आशिर्वाद आहे, म्हणूनच तिने मुलीचे नाव लक्ष्मीच्या नावावर ठेवलं आहे.


प्रार्थनेचा आशीर्वाद 

नुकतंच साक्षीनं दित्यासोबत फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिनं कुटुंबातील लोकांच्या आणि मित्रांच्या सहकार्यामुळे मला मुलीला दत्तक घेता आले. लवकरच दित्या नऊ महिन्यांची होणार आहे. तिने चाहत्यांसह हा आनंदाचा क्षण शेअर केला आहे. माझ्या प्रत्येक प्रार्थनेचा मिळालेला आशीर्वाद म्हणजे हे बाळ आहे अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. ह्या बाळामुळे मी धन्य झाले असेही ती म्हणाली.

‘कहानी घर घर की’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली साक्षी तन्वर मोठ्या पडद्यावरही तितक्याच ताकदीने भूमिका साकारताना पाहायला मिळते. ‘दंगल’, ‘मोहल्ला अस्सी’ यांसारख्या चित्रपटात तिने भूमिका साकारल्या आहेत. तर ‘बडे अच्छे लगते है’ ही तिची मालिकासुद्धा खूप गाजली होती.



हेही वाचा - 

दिपिका-रणवीर चढणार बोहल्यावर; १४,१५ नोव्हेंबरला रंगणार शाही विवाह सोहळा

#Metoo: अनू मलिकला दणका; इंडियन अायडाॅलमधून हकालपट्टी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा