Advertisement

अजयचा किस, पहिला की दुसरा?


अजयचा किस, पहिला की दुसरा?
SHARES

मुंबई - इंटिमेंट सिन, किसिंग सिन यांचे आता बॉलीवूडला फार अप्रुप राहिलेले नाही. जवळपास सगळ्याच चित्रपटात आता किसिंग सीन दिसून येतात. पण एक हिरो मात्र या किसिंगपासून दूर राहिला होता. अजय देवगण. पण अजयही आता आपल्या आगामी चित्रपटात किसिंग सिन देताना दिसणार आहे. मात्र अमिताभ बच्चन यांनी अजयचा हा पहिला किसिंग सिन नसल्याचे सांगत नवी चर्चा सुरु केली आहे.
आगामी 'शिवाय' या चित्रपटात अजयने ऑनस्क्रिन किसिंग सीन दिला आहे. या सिनेमातील 'दरख्वास्त' या गाण्यासाठी अजय आणि एरिकावर तीन मिनिटांचा किसिंग सिन चित्रित करण्यात आला आहे. या किसिंग सीनवरून अजय सध्या चर्चेत आहे. पण अमिताभ बच्चन यांनी अजयचा हा पहिला किस नसल्याचे ट्विट केले आहे. अजयने यापूर्वी प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ या सिनेमातही किसिंग सीन दिल्याचे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे. त्यामुळे अजयचा हा किस पहिला की दुसरा याची चर्चा बॉलीवुडमध्ये रंगली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा