आलिया भटने नाकारली संजूबाबाची ऑफर

  Bandra west
  आलिया भटने नाकारली संजूबाबाची ऑफर
  मुंबई  -  

  मुंबई - वडिल-मुलीच्या नात्यावर आधारित ओमांग कुमारच्या 'भूमि' या चित्रपटातून संजय दत्त पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात संजय दत्तच्या मुलीची भूमिका आलिया भटने करावी अशी संजूबाबाची  इच्छा होती. यासाठी त्यांने स्वत: पहिल्यांदा आलियाला फोन केला. मात्र त्याला काहीच उत्तर  मिळाले नाही. उत्तर न आल्याने त्याने महेश भट आणि करण जोहरच्या माध्यमातून आलियापर्यंत मेसेज पोहोचवला. मात्र तरीही आलियाचे उत्तर न आल्याने संजूबाबा चांगलाच हर्ट झालाय. एकवेळ असा होता की महेश भट यांच्या नाम, कब्जा, सडक आणि गुमराह सारख्या सिनेमात संजूबाब झळकला होता. मात्र आता आलियाच्या या अशा वागण्याने या दोन्ही परिवारात कटुता आली हे मात्र नक्की. शेवटी संजू बाबाने शिवाय सिनेमातील सैगलला यासाठी फायनल केले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.