Advertisement

रोमँटिक संगीतमय सिरीज ‘बंदिश बँडिट्स’चा ट्रेलर प्रदर्शित

ही सिरीज वेगवेगळ्या संगीत पार्श्‍वभूमींमधून असलेल्‍या दोन तरूण परफॉर्मर्सच्‍या प्रेमकथेला सादर करणार आहेत.

रोमँटिक संगीतमय सिरीज ‘बंदिश बँडिट्स’चा ट्रेलर प्रदर्शित
SHARES

अमेझॉन प्राइम व्हिडिओनं त्‍यांची नवीन रोमँटिक संगीतमय सिरीज ‘बंदिश बँडिट्स’ची घोषणा केली आहे. ही सिरीज ४ ऑगस्‍ट २०२० पासून पाहायला मिळणार आहे. अमृतपाल सिंग बिंद्रा यांची निर्मिती आणि आनंद तिवारी यांचे दिग्‍दर्शन या सिरीजला लाभले आहे. ही सिरीज वेगवेगळ्या संगीत पार्श्‍वभूमींमधून असलेल्‍या दोन तरूण परफॉर्मर्सच्‍या प्रेमकथेला सादर करणार आहेत.

‘बंदिश बँडिट्स’मध्‍ये दिग्‍गज संगीतकार त्रिकूट शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलेला उत्‍साहवर्धक ओरिजिनल साऊंडट्रॅक आहे. हे संगीतकार या सिरीजच्‍या माध्‍यमातून त्‍यांचे डिजिटल पदार्पण करत आहेत. ‘बंदिश बँडिट्स’ २०० देश आणि प्रदेशांमध्‍ये फक्‍त प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे.

हेही वाचा : कॉमेडी-ड्रामा 'लूटकेस' या तारखेला होणार प्रदर्शित

ट्रेलरची सुरुवात तमन्नासह होते. तमन्ना एक नवोदित गायिका आहे. स्वत:चं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्नशील असते. तिच्या विरुद्ध राधे नावाचा मुलगा आहे. जो त्याच्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत शास्त्रीय संगीतकार होऊ इच्छितो. वेगवेगळी स्वप्न असणारे हे दोघे अखेर भेटतात आणि प्रेमात पडतात. परंतु गाण्याच्या वारसाच्या लढाईत दोघे वेगळे होतात. पण हे संगीतच त्यांना एकत्र करते.

 ‘बंदिश बँडिट्स’चे निर्माता अमृतपाल सिंग बिंद्रा म्‍हणाले की, “बंदिश बँडिट्स ही ख-या प्रेमाला दाखवणारी सिरीज आहे. आम्‍हाला जगभरात अद्वितीय ओरिजिनल कन्‍टेन्‍ट सादर करणा-या प्राइम व्हिडिओ सारख्‍या डायनॅमिक, जागतिक सेवेवर ही सिरीज सादर करण्‍याचा आनंद होत आहे. या सिरीजचे घटक भारतीय परंपरा आणि मूल्‍यांमध्‍ये खोलवर रुजलेले आहेत.”

दहा भागांच्‍या या सिरीजमध्‍ये उदयोन्‍मुख प्रतिभावान रित्विक भौमिक हिंदुस्‍तानी शास्‍त्रीय कलाकार राधेच्‍या भूमिकेत आणि श्रेया चौधरी पॉपस्‍टार तमन्‍नाच्‍या भूमिकेत असून नसीरूद्दीन शाह, अतुल कुलकर्णी, कुणाल रॉय कपूर, शीबा चड्ढा आणि राजेश तेलंग यांसारखे दिग्‍गज कलाकार देखील यात असणार आहेत.हेही वाचा

अभिनेता वृषभ शहाची उल्लेखनीय कामगिरी

सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत रिया चक्रवर्तीनं उचललं 'हे' पाऊल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा