Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

साहेबांच्या भाषेत सांगितलं तरच तुम्हाला पटेल, मनसेची थिएटर मालकांना तंबी

हाऊसफुल ४ मुळे हिरकणी आणि ट्रिपल सीटला थिएटर मिळत नाहीत. त्यामुळे मनसेने मंगळवारीच हिरकणी चित्रपटाला थिएटर दिले नाही तर काचा फुटतील, असा इशारा दिला होता.

साहेबांच्या भाषेत सांगितलं तरच तुम्हाला पटेल, मनसेची थिएटर मालकांना तंबी
SHARES

साहेबांच्या भाषेत सांगितलं तर तुम्हाला जास्त पटेल. त्यामुळे  तुटेल इतकं ताणू नका, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर चित्रपटगृह मालकांना इशारा दिला आहे.  हिरकणी आणि ट्रिपल सीट या मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्यामुळे अमेय खोपकर यांनी चित्रपटगृह मालकांना पत्र लिहून तंबी दिली आहे. 

 प्रसाद ओक दिग्दर्शित हिरकणी हा चित्रपट २४ ऑक्टोबरला आणि ट्रिपल सीट २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. तर २६ ऑक्टोबरला हाऊसफुल ४ प्रदर्शित होणार आहे. हाऊसफुल ४ मुळे हिरकणी आणि ट्रिपल सीटला थिएटर मिळत नाहीत. त्यामुळे मनसेने मंगळवारीच हिरकणी चित्रपटाला थिएटर दिले नाही तर काचा फुटतील, असा इशारा दिला होता.

अमेय खोपकर यांनी बुधवारी चित्रपटगृह मालकांना पत्र लिहून इशारा दिला आहे. या पत्रात खोपकर यांनी म्हटलं आहे की, हिरकणी आणि ट्रिपल सीट प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांचा अथक प्रयत्न चालू आहे. पण चित्रपटगृह उपलब्ध नाही असे ठोकळेबाज उत्तर प्रत्येक ठिकाणी मिळत आहे. पण मग बाकी निर्मात्यांनी काय करायचे? कुठे जायचे? ही अशी मोनोपोली जर हिंदी निर्माते करणार असतील तर मराठी निर्मात्यांनी काय करायचे?

येणाऱ्या सर्व चित्रपटांना संधी देणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुमची चित्रपटगृहे हिंदीची बटीक नाहीत. तुम्ही म्हणाल की हा आमचा प्रश्न आहे. आम्ही जे हवे ते करु…मग नीट ऐका. महाराष्ट्राची अस्मिता जपणे आणि मराठी चित्रपटांना त्यांचे हक्क मिळवून देणे हा आमचा प्रश्न आहे आणि तो सोडवण्यासाठी आम्ही जे हवे ते करु. आम्ही समंजस आहोत, सहनशील आहोत म्हणजे दुर्बल आहोत याचा असा गैरसमज तुम्ही करुन घेतला असेल तर तो चुकीचा आहे.

साहेबांच्या भाषेत सांगितले तर तुम्हाला जास्त पटेल. स्वत: जगा आणि दुसऱ्याला जगू द्या. त्यात दोघांचेही हित आहे. आणि या दोन्ही भाषा तुम्हाला समजत नसतील तर मग आम्हाला आमच्या खास भाषेत तुम्हाला समजवावं लागेल. तेव्हा तुटेल तेवढे ताणू नका, असं अमेय खोपकर यांनी सांगितलं आहे.हेही वाचा -

हिरकणीला थिएटर न मिळाल्यास खळ्ळखट्टयाक, मनसेचा इशारा
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा