Advertisement

आनंदा कारेकर शिकला ईस्ट इंडियन मराठी भाषा!

विनोदवीर आनंदा कारेकरनं नेहमीच लहानसहान भूमिकांमध्येही मराठमोळ्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. छोट्या परंतु कथेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या आनंदाला आगामी चित्रपटासाठी ईस्ट इंडियन मराठी भाषा शिकावी लागली.

आनंदा कारेकर शिकला ईस्ट इंडियन मराठी भाषा!
SHARES

विनोदवीर आनंदा कारेकरनं नेहमीच लहानसहान भूमिकांमध्येही मराठमोळ्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. छोट्या परंतु कथेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या आनंदाला आगामी चित्रपटासाठी ईस्ट इंडियन मराठी भाषा शिकावी लागली.


तुझीच रे

दिवंगत पत्रकार राजा कारळे यांचे चिरंजीव प्रवीण कारळे सध्या आपल्या आगामी चित्रपटात बिझी आहेत. ‘तुझीच रे’ असं शीर्षक असलेल्या या आगामी मराठी चित्रपटात आनंदा एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे. या भूमिकेसाठी आनंदानं कसून मेहनत घेतली आहे. या चित्रपटात आनंदा कुंभाराची भूमिका साकारत असल्यानं त्याला मडकी बनवण्याची कलाही आत्मसात करावी लागली आहे.


फिलीप नावाची व्यक्तिरेखा 

‘तुझीच रे’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मडकी बनवण्याबद्दल आनंदा म्हणाला की, ‘तुझीच रे’ या चित्रपटात मी व्यवसायानं कुंभार असलेल्या फिलीप नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. यासाठी मला वसई गावातील कुंभाराकडून मडकी बनवण्याची कला शिकावी लागली. ही कला वाटते तितकी सोपी नाही. मातीचा गोळा आपल्याला वाटतो तितका मऊ नसतो. यासाठी हातावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. ही कला शिकण्यासाठी मला एक आठवडा घाम गाळावा लागला.


धारावीत चाक सापडलं

मडकी बनवण्यासोबतच आनंदानं ईस्ट इंडियन मराठी भाषेचेही धडे गिरवले आहेत. याविषयी आनंदा म्हणाला की, मी साकारलेल्या कुंभाराची भाषा ईस्ट इंडियन मराठी आहे. मुंबईतील स्थायिक लोकांची ही खरी भाषा आहे. जी कोकणी भाषेशी मिळतीजुळती असल्याचं आनंदा म्हणाला. या व्यक्तिरेखेत जीव ओतण्यासाठी कारळे यांनी खूप मेहनत घेतली आहे. शहरांतून कुंभार हद्दपार झाल्यानं मडकी बनवण्यासाठी लागणारं चाक कुठेही सापडत नव्हतं. अखेर धारावीत ते चाक सापडलं. एका सीनसाठी ते चाक वसईला नेऊन शूट करण्यात आलं.




हेही वाचा - 

क्रिकेटर रणवीर सिंगचा हा व्हिडीओ पाहिला का?

कतरिनानेच मारली बाजी; पुन्हा बनली अक्षयची नायिका



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा