Advertisement

बोले तो सेम टू सेम ना भाय...


बोले तो सेम टू सेम ना भाय...
SHARES

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर सध्या संजय दत्तच्या जीवनावर आधारीत चिञपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. चिञपटात संजय दत्त आयुष्यातील सहा वेगवेगळे टप्पे दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे रणबीर कपूर सहा वेगवेगळ्या लूक्समध्ये तुम्हाला दिसणार आहे. त्यापैकीच एक लूक लिक झाला आहे. सोशल मीडियावर सध्या याची खूप चर्चा आहे. दाढी, मिशा, कपाळावर लाल टिळा आणि निळ्या रंगाचा शर्ट या प्रौढ रुपातला रणबीर हुबेहूब संजय दत्त सारखाच दिसत आहे.

यापूर्वीही रणबीरचा लूक लिक झाला होता. त्यामुळे रणबीरला बाहेर फिरण्यास मनाई होती. पण एवढ्या गुप्ततेनंतरही रणबीरचा नवा लूक लिक झाला आहे.

रणबीरने या चिञपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. संजय दत्त सारखी बॉडी बनवण्यासाठी जीममध्ये घाम गाळला आहे. लवकरच या चिञपटाचे शूटिंग पूर्ण होणार आहे.

संबंधित विषय
Advertisement