अंकिता लोखंडेचा 'नया रिश्ता'!

 Mumbai
अंकिता लोखंडेचा 'नया रिश्ता'!
Mumbai  -  

सिनेजगताच्या झगमगत्या दुनियेत रोज काहीतरी नवनवीन घडत असत. कोणाचा ब्रेकअप तरकोणाच पॅचअप! या बातम्या तर हल्ली कलाकारच स्वतः त्यांच्या फॅन्सना सांगताना पाहायला मिळतात. सध्या अशीच चर्चा रंगतेय ती अंकिता लोखंडे हिच्याबद्दल. अंकिता आणि सुशांत यांचे प्रेमसंबंध, त्यांनी लपून केलेलं लग्न, नंतर ते वेगळे झालेयत अशी बरीच चर्चा या आधी झाली होती. पण आता अंकिता सुशांतच्या या सगळ्या गोष्टीतून मुव्हड ऑन झाली आहे असं म्हणायला हरकत नाही.

सुशांत आणि क्रिती ह्यांच्या प्रेमसंबंधांची चर्चा असतानाच आता अंकिता आणि बिजनेस मॅन विकास जैन ह्यांच्यातील जवळीक आता वाढतेय असं समजतंय. हल्लीच अंकिता आणि विकास यांना एका पार्टीमध्ये एकत्र पाहिलं गेलं होतं. आणि होळीच्या दिवशी त्यांनी एकमेकांबरोबर जास्त वेळ घालवला होता.

गेल्या काही वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. एका कॉमन मित्रामुळे त्यांची ओळख झाली होती. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांची जवळीक जास्त वाढली आहे. बऱ्याच वेळा विकासला अंकिताच्या घरी जातानाही पाहिलं गेलं आहे. अर्थात अजून दोघांपैकी कोणीही हे जाहीर केलेलं नाही.

Loading Comments