Advertisement

क्वारंटाईन कविता


क्वारंटाईन कविता
SHARES

मुंबईसह जगभरात भयंकर अशा कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५ हजाराहून अधिक असून मुंबईकरांनाही कोरोनानं चांगलंच घेरलं आहे. कोरोना हा संसर्गजन्य असल्यामुळं दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केली. त्यानुसार, देश २१ दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आला आहे. लॉकडाउनच्या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं अनेक नागरिकांना २४ तास २१ दिवस घरी बसून काय करायचं असा प्रश्न पडला आहे. तर काही जण आपला वेळ गाण्यांच्या भेंड्या, कविता, खेळ, गप्पा-गोष्टी यामध्ये घालवत आहे. त्याचप्रमाणं, मोकळा वेळ असल्यानं अनेकजण कोरोना व्हायरसवर कविता करत आहेत. 

या भयंकर अशा कोरोनाची कवितेच्या माध्यमातू भिती व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेकांनी कविता शेअर केल्या आहेत. याच कविता करणाऱ्यांसाठी मुंबईतील अंतरंग थिएटर्सनं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. अंतरंग थिएटर्सनं 'QUARANTINE कविता' या नावानं एका उपक्रमाचं आयोजन केलं असून, या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या कविता लोकांपर्यंत पोहचवता येणार आहेत.

नागरिकांना आपल्या कविता लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी 8291811757 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. तुम्ही तुमच्या कोरोनाविषयी स्वलिखित कविता या क्रमांकावर पाठवल्यास 'Theatreholic' या युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात येणार आहेत.

मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील अनेक कवींनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. तसंच, यामध्ये सामान्य माणसांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती अंतरंग थिएटर्सचे प्रमुख व मराठी कलाकार रोहन पेडणेकर यांनी दिली.

अनेकदा सामान्य माणूस कविता करायला घाबरतो, त्याला आपली कविता लोकांना आवडेल, की नाही याची भीती असते. परंतु, अंतरंग थिएटर्सनं सुरू केलेल्या 'QUARANTINE कविता' या उपक्रमामुळं समान्यांना आपल्यातील कवीला जाग करता येणार असून, आपली कविता घरबसल्या लोकांसमोर सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. 












संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा