Advertisement

संजय दत्तच्या सिनेमात झळकणार अनुप


संजय दत्तच्या सिनेमात झळकणार अनुप
SHARES

अनुप सोनी हे नाव ‘क्राइम पेट्रोल” या गुन्हेगारी विश्वावर प्रकाश टाकणाऱ्या शोमुळं आज घराघरात पोहोचलं आहे. मागील आठ वर्षांपासून या क्राइम सिरीजचं यशस्वी सूत्रसंचालन करणारा अनुप संजय दत्तच्या आगामी सिनेमात झळकणार आहे.


आईच्या जन्मदिनी शूटिंगची सुरुवात

आई नर्गिस दत्त यांच्या ८९ व्या जन्मदिनी म्हणजेच १ जून रोजी संजय दत्तने आपल्या होम प्रोडक्शनमध्ये बनणाऱ्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला प्रारंभ केला आहे. ‘प्रस्थानाम’ या साऊथमध्ये गाजलेल्या सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. यापूर्वी तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित झाला असून चांगलाच गाजला आहे.



लखनौमध्ये चित्रीकरण

या सिनेमाच्या शीर्षकाबाबत अद्याप काहीही माहिती देण्यात आली नसली तरी लखनौमध्ये चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात आला असल्याचं समजतं. या सिनेमात संजयसोबत मनिषा कोइराला मुख्य भूमिकेत आहे. याखेरीज अनूप, अली फजल आणि अमायरा दस्तूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.


यापूर्वीही संजयसोबत काम

अनुपने यापूर्वीही काही सिनेमांमध्ये संजयसोबत काम केलं आहे. ‘प्रस्थानाम’च्या तेलुगू सिनेमामध्ये अनुपने संजयच्या कुटुंबातील सदस्याची भूमिका साकारली आहे. जुलैमध्ये हिंदी रिमेकमधील महत्त्वाचे सीन दोघांवर चित्रीत करण्यात येणार असल्याचं समजतं.



हेही वाचा -

राजेश श्रृंगारपुरे खेळणार अाता गोट्या

मिलिंद म्हणतोय ‘रे राया’



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा