Advertisement

‘Once मोअर’ म्हणत सिनेमाकडे वळला आशुतोष पत्की

अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या नरेश बिडकरवच्या ‘Once मोअर’ या सिनेमात आशुतोष मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अभिनय हे आशुतोषचं पॅशन आहे. त्यामुळेच बारावीनंतर हॅाटेल मॅनेजमेंट पूर्ण करून तो थेट अभिनयाकडे वळला. अनुपम खेर अॅकॅडमीमध्ये अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. ‘मेंदीच्या पानावर’ आणि ‘दुर्वा’ या गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून आशुतोष घराघरात पोहोचला आहे.

‘Once मोअर’ म्हणत सिनेमाकडे वळला आशुतोष पत्की
SHARES

आजवर बऱ्याच कलाकारांच्या मुलांनी आई-वडिलांचा वारसा जपत अभिनयक्षेत्रात प्रवेश केला आहे. पण काही गायक-संगीतकारांच्या मुलांची पावलंही अभिनयाकडे वळली आहेत. यात आता ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आशुतोषचं नावही सामील झालं आहे.

अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या नरेश बिडकरवच्या ‘Once मोअर’ या सिनेमात आशुतोष मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अभिनय हे आशुतोषचं पॅशन आहे. त्यामुळेच बारावीनंतर हॅाटेल मॅनेजमेंट पूर्ण करून तो थेट अभिनयाकडे वळला. अनुपम खेर अॅकॅडमीमध्ये अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. ‘मेंदीच्या पानावर’ आणि ‘दुर्वा’ या गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून आशुतोष घराघरात पोहोचला आहे.

'अभिनय माझं पॅशन' 

संगीताकडे न वळता अभिनय करण्याबाबत आशुतोष म्हणाला, 'गाणं आणि संगीत बालपणापासूनच ऐकत आलो आहे, पण अभिनय हे माझं पॅशन आहे. बाबांनीही कधीच कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स केला नाही की अडवलं नाही. हा सिनेमाही मला त्यांच्यामुळेच मिळाला आहे. या सिनेमाचे निर्माते सुहास जहागीरदार बाबांना खूप मानतात. त्यांनी सिनेमात काम करण्याबाबत विचारलं, तेव्हा कथा आणि व्यक्तिरेखा ऐकून होकार दिल्याचं' आशुतोष म्हणाला.

नवोदित अभिनेत्रीचं आगमन

या सिनेमात आशुतोषसोबत धनश्री दळवी ही नवोदित अभिनेत्री दिसणार आहे. त्याशिवाय रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, सुशांत शेलार आदी मराठी सिनेसृष्टीतील अनुभवी कलाकारही या सिनेमात आहेत. श्वेता बिडकर यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. छायांकन संजय सिंग यांचं आहे. मुंबईसह फिल्मसिटी व गोवा येथील विविध लोकेशन्सवर या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.

हेही वाचा -

‘पटरी बॉईज’ १९ ऑक्टोबरपासून रुळावर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा