Advertisement

‘पटरी बॉईज’ १९ ऑक्टोबरपासून रुळावर


‘पटरी बॉईज’ १९ ऑक्टोबरपासून रुळावर
SHARES

मुंबईतील झोपडपट्टीकडे जरी अभिषाप म्हणून पाहिलं जात असलं तरी हीच झोपडपट्टी अनेकदा रुपेरी पडद्यावर हिरो बनली आहे. झोपडपट्टीच्या शेजारील रेल्वे पटरीवर आधारित ‘पटरी बाईज’ हा सिनेमा १९ आक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी अर्थात धारावी… अगदी सामान्य माणसापासून, नगरसेवकापासून ते थेट मंत्र्यांपर्यंत साऱ्यांचीच नजर या झोपडपट्टीवर असते. इथे राहतात विविध जातीधर्माचे लोक. त्यातूनच हाणामारी, मारामारी, वाद होत असतात. हे वाद इथलेच लोकलभाई अर्थात झोपडपट्टीदादा सोडवतात.

अशाच एका झोपडपट्टीतील सात बालगुन्हेगारांची कथा या सिनेमात पाहायला मिळणार आहे. ‘श्रीरंगलेखा एन्टरटेन्मेंट’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती वेंकटवर्धन नरसिंहन अय्यंगार, श्रीधर अय्यंगार, अश्विन भराडे यांनी केली असून, दिग्दर्शन अजित साबळे आणि मनोज येरूणकर यांनी केलं आहे.

पाकिटमारी, हाणामाऱ्या करणाऱ्या या सात जणांना एका चोरीदरम्यान एक गोष्ट सापडते. ती मिळवण्यासाठी या सात जणांमध्ये झालेला संघर्ष आणि या सात जणांकडून हीच गोष्ट मिळवण्यासाठी इतरांनी केलेली धडपड यावर हा चित्रपट बेतला आहे.

अरुण नलावडे, गणेश यादव, मिलिंद गवळी, संजय खापरे, भूषण घाडी, मौसमी तोंडवळकर, डॉ. राजेश आहिर, संदीप जुवाटकर, नितीन बोधारे, मीरा जोशी, विकास खैरे, मिथुन चव्हाण, जयेश चव्हाण, सुधीर घाणेकर, परी लता, सानिया पाटील, श्रद्धा धामणकर या कलाकारांच्या या सिनेमात भूमिका आहेत. कथा, पटकथा, संवाद अजित साबळे आणि मनोज येरूणकर यांनी लिहिले आहेत.


हेही वाचा -

मेघा धाडे बनली ‘बिग बॅास’ची ‘सुपरस्टार’

आपला ‘सैराट’च 'झिंगाट'!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा