Advertisement

अास्ताद झाला बिग बॉसच्या घरातील कॅप्टन

बिग बाॅसच्या घरातील सदस्यांनी बहुमताने आस्ताद काळे याची घराचा नवीन कॅप्टन म्हणून निवड केली. आस्ताद घराचा ताबा कसा घेतो ? त्याच्यापुढं कोणत्या अडचणी येतील ? सदस्य त्याला समजून घेतील का ? हे बघणं आता रंजक ठरणार आहे.

अास्ताद झाला बिग बॉसच्या घरातील कॅप्टन
SHARES

विनीत भोंडे कॅप्टन पदावरून पायउतार झाल्यावर बिग बाॅसच्या घरातील सदस्यांनी बहुमताने आस्ताद काळे याची घराचा नवीन कॅप्टन म्हणून निवड केली. आस्ताद घराचा ताबा कसा घेतो ? त्याच्यापुढं कोणत्या अडचणी येतील ? सदस्य त्याला समजून घेतील का ? हे बघणं आता रंजक ठरणार आहे.


पुरेसं बजेट

घरातील सदस्यांमध्ये सध्या एकच चर्चा ऐकायला मिळत होती, ती म्हणजे Luxury बजेट किती मिळेल. कॅप्टन अास्तादने बजेट चांगलं मिळालं असून त्यातून गरजेच्या गोष्टीच मागवूया, असं सांगताच, त्याला बाकीच्या सदस्यांनी संमती दिली.


 'त्या' दोघाींमध्ये पुन्हा मैत्री  

बिग बॉसच्या घरात दोन ग्रुप तयार झाल्याने त्याचा फायदा दोन जुन्या मैत्रीणींना झाला. मेघा आणि आरती काही वर्षांपूर्वी खूप चांगल्या मैत्री होत्या. पण काही कारणांमुळे दोघींमध्ये दुरावा निर्माण झाला. हा दुरावा बिग बाॅसमुळे दूर होताना दिसत आहे. दोघींमधील अंडरस्टँडिंग कशी डेव्हलप होतेय, हे पाहणं रंजक ठरणार आहे. 


 

सई, पुष्करमध्ये जमली गट्टी

घरातील सदस्यांना कुटुंबाची कशी आठवण येते हे पुढच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. ऋतुजा आणि सई या दोघींना कुटुंबाची आठवण येत असल्याचं त्यांनी पुष्करला सांगितलं. खासकरून सईच्या मनात काय आहे हे ती पुष्करला सांगणार आहे. सईशी घरातील सगळे सदस्य चांगले वागत असताना तिला नॉमिनेट कसं करायचं ? तिला नाही करायचं तर कोणाला करायचं ? त्यासाठी काय कारण द्यायचं ? असा पेचप्रसंग घरातील सदस्यांपुढं उभा राहणार आहे.



बिग बॉसच्या घरामध्ये अंताक्षरी आणि इतर खेळ रंगतात. पण विनीतला चमचा-लिंबूचा खेळ खेळण्याची इच्छा आहे. त्याची ही इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घरातील सदस्यांनी घेतला आहे. असं गमतीशीर वातावरण असताना घराबाहेर कोण जाईल, या विचाराने सर्वच सदस्यांना सतावून सोडलं आहे. विकेंडचा डाव महेश मांजरेकर खेळणार असल्याने ते कुणाच्या नावाचा पुकारा करतात, हे बघणं मजेशीर ठरणार आहे. 


हेही वाचा-

विनीत भोंडे बनला मराठी बिग बॉसच्या घराचा गाईड!

बिग बॉसने दिली यज्ञाची आज्ञा!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा