'बाहुबली 2'ने पहिल्याच दिवशी पार केला 100 कोटींचा टप्पा!

 Mumbai
'बाहुबली 2'ने पहिल्याच दिवशी पार केला 100 कोटींचा टप्पा!
Mumbai  -  

एस. एस. राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली 2' हा सिनेमा शुक्रवारी देशभरात प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या अवघ्या काही वेळातच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. त्यामुळे एकीकडे भारतीय सिनेमातील हा सर्वात मोठा ओपनिंग सिनेमा ठरला असून दुसरीकडे पहिल्याच दिवशी या सिनेमाने 100 कोटींपेक्षाही जास्त कलेक्शन केले आहे. प्रदर्शानाच्या दिवशी या सिनेमाचे जवळपास सर्वच शो हाऊसफुल्ल राहिले. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 35 ते 40 कोटींची कमाई केली. या सिनेमाने सकाळी 95 टक्के प्रेक्षकांसह ओपनिंग केली. देशभरातील अनेक सिनेमागृह शनिवरीही हाऊसफुल्ल झाले होते. या सिनेमाला देशभरात 8 हजार स्क्रिनिंग मिळाले. प्रदर्शानाच्या सुरुवातीलाच या सिनेमाने सलमान खानच्या सुल्तान आणि आमिर खानच्या दंगल या सिनेमांना देखील मागे टाकले आहे.

हे पण वाचा - 'बाहुबली २'...अखेर उत्तर मिळालं! - https://www.mumbailive.com/mr/entertainment/never-seen-such-a-grand-scale-of-film-release-as-bahubali-carnival-cinemas-11031

Loading Comments