'बाहुबली २'...अखेर उत्तर मिळालं!

Mumbai
'बाहुबली २'...अखेर उत्तर मिळालं!
'बाहुबली २'...अखेर उत्तर मिळालं!
See all
मुंबई  -  

कटप्पानं बाहुबलीला का मारलं? या एकमेव प्रश्नाचं उत्तर मिळावं म्हणून प्रेक्षक दोन महिन्यांपासून प्रतीक्षा करत होते. अखेर शुक्रवारी 'बाहुबली २: द कन्क्लूजन' जगभरात ९൦൦൦ थिएटरमध्ये तर भारतात ६५൦൦ थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ती प्रतीक्षा अखेर संपली आणि कटप्पानं बाहुबलीला का मारलं? याचं उत्तर पहिल्याच दिवशी चित्रपट पाहणाऱ्यांना मिळालं. अपेक्षेप्रमाणे भव्य सेट, राजा आणि राणी, त्यांची प्रेमकहानी, सिंहासनासाठी होणारं राजकारण असा सर्व मसाला चित्रपटात आहे.

आत्तापर्यंतच्या चित्रपटांमध्ये मी पहिला असा चित्रपट पाहतोय ज्याच्या तिकिटांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे. सध्या कार्निवल सिनेमात 'बाहुबली २: द कन्क्लूजन'चे १ हजार ३१४ शो आम्ही लावले आहेत. कार्निवलमध्ये लावण्यात आलेल्या चित्रपटांपैकी हा पहिला चित्रपट आहे ज्याचे इतके शो लावण्यात आले आहेत. बंगळुरुमध्ये आम्ही सकाळी ५.३൦ वाजताचा शोही लावला होता आणि तोही शो हाऊस फुल होता 

- पी. व्ही. सुनील, संचालक, कार्निवल सिनेमा

शुक्रवारी 'बाहुबली २: द कन्क्लूजन' हा चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्या शोला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होती. सर्व थिएटर हाऊसफुल झाले होते. "थिएटरमध्ये चित्रपटाचे आणखी शो असावेत, अशी मागणी प्रेक्षकांकडून केली जात आहे. त्यामुळे चित्रपट या विकेंडमध्ये ७൦ करोडपेक्षा अधिक कमाई करू शकतो," असं कार्निवल सिनेमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक पी. व्ही. सुनील यांनी सांगितलं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.