पद्मावतीने वाढवल्या दीपिकाच्या अडचणी

  Mumbai
  पद्मावतीने वाढवल्या दीपिकाच्या अडचणी
  मुंबई  -  

  मुंबई - दीपिका पदुकोणच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. तिचा ट्रिपल एक्स हा सिनेमा भारतात फ्लॉप ठरल्यानंतर आता 'पद्मावती'ने तिच्यासमोर आणखी एक अडचण निर्माण केली आहे. 'पद्मावती' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान आधी राजस्थानमध्ये विरोध दर्शवण्यात आला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातल्या कोल्हापुरात पद्मावतीच्या चित्रीकरणादरम्यान सेटला आग लावण्यात आली. त्यामुळे आता दीपिका तिच्या विदेशी प्रोजेक्टला घेऊन चिंतेत आहे. खरंतर दीपिकाकडे सध्या हॉलिवूड सिनेमांचे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. मात्र पद्मावती सिनेमाचं शूटिंग लवकर पूर्ण झालं नाही तर तिला हॉलिवूडच्या प्रोजेक्ट्सशी समझोता करावा लागणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.