Advertisement

'नशीबवान' भाऊची स्वच्छता मोहीम!

दिवाळीत ठिकठिकाणी फटाके वाजवले जातात, पण त्यातून होणाऱ्या कचऱ्याकडं सहज कानाडोळा केला जातो. परिसर अस्वच्छ करणारा हा कचरा त्वरित उचलणं गरजेचं असून, हाच संदेश बांद्रा येथील निवासी वसाहतीमध्ये 'नशिबवान' चित्रपटाच्या टीमने स्वच्छता मोहीम राबवत दिला.

'नशीबवान' भाऊची स्वच्छता मोहीम!
SHARES

एखाद्याला सहजपणे कोणतीही गोष्ट प्राप्त झाली की त्याला सर्वचजण नशीबवान म्हणतात. असाच खराखुरा नशीबवान आहे अभिनेता भाऊ कदम. प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम आणि वाट्याला येणाऱ्या प्रत्येक भूमिकेत विविधता जपण्याचं कसब यामुळे भाऊ आज सर्वांचा लाडका झाला आहे. त्यामुळे त्याला नशीबवान म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असा हा नशीबवान भाऊ सध्या स्वच्छता मोहीम राबवण्यात दंग आहे.


माणूसच जबाबदार

माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या जोडीला नशिबाची साथ असते. त्यामुळे तो भरपूर प्रमाणात आपल्या नशिबावर अवलंबून असतो, असंही म्हटलं जातं.  उदाहरणार्थ, आपल्या दैनंदिन जीवनात काही काम चांगल्या पद्धतीने पार पडलं की, अमुक व्यक्तीने नशीब काढलं असं बोललं जातं, पण जर हेच काम बिघडलं तर त्याच्या नशिबाला कोसलं जातं. मुळात, आपलं नशीब आपल्याच हातात असतं. आयुष्यात येणाऱ्या चढ उताराला माणूसच जबाबदार असतो. मात्र, नाव नशिबाचं पुढं केलं जातं.

 

नशिबाच्या संकल्पनेवर

नशिबाच्या याच संकल्पनेवर आधारीत असलेला एक नवाकोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं शीर्षक 'नशीबवान' असं आहे. या चित्रपटात स्वच्छतेसाठी भाऊने झाडू हाती घेतला आहे. अमोल गोळेने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचं नुकतंच सोशल नेटवर्किंग साईटवर मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं.  'नशीबवान'च्या या मोशन पोस्टरवर भाऊ एक स्वच्छता कामगाराच्या भूमिकेत दिसतो. तसंच, त्याच्या हातात त्याचा साथीदार म्हणजे साफ-सफाई करणारा झाडूसुद्धा तेवढ्याच दिमाखात चमकत असल्याचं पहायला मिळतं.  


भाऊने घेतला झाडू

'नशीबवान'मधील भाऊच्या व्यक्तिरेखेचं सर्वत्र कौतुक होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या दिवाळी सणाच्या उत्तरार्धात भाऊने याच व्यक्तिरेखेचा पेहराव धारण करत, मुंबईकरांना परिसर स्वच्छ राखण्याचा संदेशदेखील दिला होता. दिवाळीत ठिकठिकाणी फटाके वाजवले जातात, पण त्यातून होणाऱ्या कचऱ्याकडं सहज कानाडोळा केला जातो. परिसर अस्वच्छ करणारा हा कचरा त्वरित उचलणं गरजेचं असून, हाच संदेश बांद्रा येथील निवासी वसाहतीमध्ये 'नशिबवान' चित्रपटाच्या टीमने स्वच्छता मोहीम राबवत दिला. या मोहिमेत भाऊने रस्त्यावर उतरून सफाई कर्मचाऱ्यासोबत हातात झाडू घेऊन रस्ता साफ करत, मोलाचा हातभार लावला. भाऊबिजेच्या मुहूर्तावर राबविण्यात आलेल्या या मोहिमेला स्थानिकांनीदेखील प्रतिसाद दिला. 


११ जानेवारीला प्रदर्शित  

उदय प्रकाश लिखित 'दिल्ली की दीवार' या कथेवर आधारीत असलेला 'नशीबवान'  हा सिनेमा नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ११ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी यांची देखील मुख्य भूमिका आहे. 


लिंक:  https://www.youtube.com/watch?v=RSfT-uOUXUQ



हेही वाचा - 

नेटफ्लिक्सचा धमाका, लवकरच घेऊन येत आहेत नऊ सिनेमे

सईच्या डोळ्यांत का तरळले आनंदाश्रू?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा