Advertisement

'बिग बॉस'मध्ये आस्ताद काळेनं कुणासाठी केलं मुंडन?


'बिग बॉस'मध्ये आस्ताद काळेनं कुणासाठी केलं मुंडन?
SHARES

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरामधून दर आठवड्याला घरामधील सदस्यांपैकी कोणीतरी एक जण एलिमिनेट होतो. परंतु, काल प्रेक्षक तसेच घरातील सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसला, जेव्हा महेश मांजरेकर यांनी घरातून कोण बाहेर जाणार याचा निकाल सोमवारी लागणार अशी घोषणा केली. सध्या नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी रेशम आणि राजेश डेंजर झोन मध्ये आहेत. तेव्हा हे बघणं रंजक असणार आहे की या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल?



आणि आस्ताद काळेने मुंडन केलं

स्मिता गोंदकरसाठी आस्ताद काळाने चक्क मुंडन केलं आहे! पण त्यानं नक्की कोणत्या कारणासाठी मुंडन केलं? हे पुढच्या भागामध्ये कळणार आहे.


रणांगण पेटलं बिग बॉसच्या घरात

कालच्या 'WEEKEND चा डाव' मध्ये महाराष्ट्राचे दोन लाडके कलाकार स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगावकर आले होते. बिग बॉसने घरातील सदस्यांना काल एक टास्क दिलं, ज्यामध्ये बिग बॉसच्या घरातील रहिवाशांना मातीचे मडके फोडायचे होते, ज्यावर त्यांना घरातील एका सदस्याचा फोटो लावायचा होता. मेघाने रेशमचा फोटो लावून मडकं फोडलं, तर रेशमने मेघाचा तसेच राजेशने सईचा फोटो लावून मडकं फोडलं. घरातील सदस्यांचा निरोप घेताना सचिन पिळगावकर यांनी घरातील सदस्यांना एक संदेशही दिला.



हेही वाचा

बिग बॉसच्या घरात रंगला 'चोर पोलिसा'चा खेळ


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा