सलमान खान दाऊदला घाबरत असेल पण मी नाही - जुबैर खान

  Mumbai
  सलमान खान दाऊदला घाबरत असेल पण मी नाही - जुबैर खान
  मुंबई  -  

  टेलिव्हीजन जगतातील वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस'मध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. शनिवारी विकेंडला प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये सलमान खाननं घरवाल्यांचा चांगलाच क्लास घेतला. सलमान खान सर्वात जास्त जुबैर खानवर संतापला. सलमान खाननं क्लास घेतल्यानंतर जुबैरनं झोपेच्या गोळ्या खाल्याचं समोर आलं आहे. यानंतर जुबैरला तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आलं. सध्या जुबैरची प्रकृती ठीक आहे.


  जुबैर काय बोलला सलमान विरोधात?

  प्रकृती सुधारल्यानंतर जुबैरनं मीडियाशी संवाद साधला. यावेळी जुबैरनं गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं कबुल केलं आणि या सर्वासाठी त्यानं सलमान खानला दोषी ठरवलं आहे. 'नॅशनल टेलिव्हीजनवर सलमान मला खूप बोलला. त्यामुळे मी नैराश्यात गेलो होतो. मला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडायचे होते. त्यामुळे मी गोळ्या खालल्या,' असं जुबैरनं स्पष्ट केलं.

  याशिवाय जुबैरनं सलमान खानवर आगपाखड केली. 'सलमान खान स्वत:ला काय समजतो. मी विवेक ऑबरॉय आणि एजाज खान सारखा नाही आहे. त्यांच्यासारखं मी ऐकून घेणार नाही. 'दाऊदच्या नावानं सलमानची फाटत असेल, पण माझी नाही' अशा शब्दात त्यानं सलमानला सुनावलं. याशिवाय 'तू मला कुत्रा बनवणार ना? मग कुठे भेटू सांग? फक्त हिंमत असेल तर तू बॉडिगार्डशिवाय ये, असे आव्हानही जुबैरनं सलमानला दिलं.  जुबैरची सलमान खान विरोधात तक्रार

  जुबैरच्या वागणुकीमुळे सलमाननं त्याला चांगलेच फटकारले. पण आता हेच सलमानच्या अंगलट आले आहे. जुबैर खाननं सलमानविरोधात अँटॉप हिल पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. बिग बॉसचा सेट लोणावळ्यात असल्यानं अँटॉप हिल पोलिसांनी लोणावळा पोलिसांकडे ही तक्रार सोपवली आहे. 'बाहेर आल्यावर तुझी हालत कुत्र्यासारखी करीन, अशी धमकी सलमान खाननं नॅशनल टेलिव्हीजनवर जुबैरला दिली. याचविरोधात जुबैरनं सलमानविरोधात तक्रार दाखल केली आहे.


  जुबैरवर सलमान का भडकला?

  'बिग बॉस'च्या पहिल्या दिवसापासून जुबैर इतर कन्टेस्टंटसोबत भांडत होता. अर्शीबद्दल जुबैर आक्षेपार्ह बोलता होता. 'दो कौडी की औरत' अशी भाषा जुबैरनं अर्शीसाठी वापरली होती. यावरून सलमान खाननं त्याला चांगलंच फटकारलं होतं. 'जब तुम बिग बॉस आए थे तो तुम्हारी कोई औकात वैसी ही नही थी. यह किसी का दामात नही है. जिस परिवार से यह अपना नाम जोडता है इसका उससे कोई लेना देना नही है. अपनी औकात दिखानी है तो मेरे सामने अपनी गंदगी निकाल,' अशा शब्दांमध्ये सलमान जुबैरवर संतापला.  हेही वाचा - 

  आबब ! बिग बॉसच्या एका भागासाठी सलमान एवढं घेतो मानधन  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.