रेशम बनली कॅप्टन!

घरातील सदस्यांना ध्येयाच्या आणखी जवळ नेण्यासाठी बिग बॉस यांनी कॅप्टन्सीच्या उमेदवारांना ‘चाल-वाटचाल’ हे कॅप्टनसीचं कार्य सोपावलं. ज्यामध्ये रेशम, सई आणि नंदकिशोर हे उमेदवार होते. या टास्कमध्ये मेघा आणि सईचे रेशमसोबत वाद विवाद झाले.

  • रेशम बनली कॅप्टन!
  • रेशम बनली कॅप्टन!
SHARE

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये बिग बॉस यांनी सोपवलेलं ‘द ग्रेट डिक्टेटर’ हे कार्य सुरु होतं. ज्यामध्ये नंदकिशोर हुकूमशाह आणि घरातील इतर सदस्य प्रजा होती. ‘द ग्रेट डिक्टेटर’ या कार्यामध्ये प्रजा विजयी ठरली. सदस्यांच्या एकमताने नंदकिशोर, रेशम आणि सई हे तिघे या आठवड्याच्या कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी उभे राहिले. काल
शुक्रवारी बॉसच्या घरामध्ये ‘चाल-वाटचाल’ हे कॅप्टनसीचं कार्य रंगलं.

घरातील सदस्यांना ध्येयाच्या आणखी जवळ नेण्यासाठी बिग बॉस यांनी कॅप्टन्सीच्या उमेदवारांना ‘चाल-वाटचाल’ हे कॅप्टनसीचं कार्य सोपावलं. ज्यामध्ये रेशम, सई आणि नंदकिशोर हे उमेदवार होते. या टास्कमध्ये मेघा आणि सईचे रेशमसोबत वाद विवाद झाले.


नंदकिशोर यांनी टास्कमधून काही शारीरिक कारणास्तव माघार घेतली. त्यानंतर सई आणि रेशममध्ये पुढे हा टास्क रंगत गेला. टास्कदरम्यान सईच्या नकळत रेशम सईचे अर्धे पाऊल शूजमधून काढण्यात यशस्वी ठरली, पण तिला अडवत असताना सईच्या पाठीला हिचका बसला. तसंच तिच्या पायालादेखील इजा झाली. पाठदुखीमुळे तिनेही बऱ्याच वेळानंतर या टास्कमधून माघार घेतली आणि या टास्कमध्ये विजयी ठरत रेशम बिग बॉसच्या घराची नवी कॅप्टन बनली.


मेघा, पुष्कर, सई आणि शर्मिष्ठामध्ये शुक्रवारी झालेल्या टास्कवरून थोडी नाराजी बघायला मिळणार आहे. नक्की काय आहे नाराजीचं कारण ते शनिवारच्या भागामध्ये प्रेक्षकांना कळेलच. यासोबतच आज महेश मांजरेकरांसोबत वीकेंडचा डावही रंगणार आहे. आजच्या वीकेंडच्या डावात काय धमाल होते ती पाहायची आहे.हेही वाचा-

वास्तवतेला स्पर्शून जाणारी प्रेरणादायी कथा!- झिपऱ्या

येतोय जॅान अब्राहमचा पहिला मराठी सिनेमा!संबंधित विषय
ताज्या बातम्या