Advertisement

येतोय जॅान अब्राहमचा पहिला मराठी सिनेमा!

सुभाष घई, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, अजय देवगण, रोहित शेट्टी, संजय लीला भन्साळी या हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गजांच्या पावलावर पाऊल टाकत जॅाननेही मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे.

येतोय जॅान अब्राहमचा पहिला मराठी सिनेमा!
SHARES

अॅक्शन-रिअॅक्शनचं अचूक टायमिंग जुळवत विनोदी अभिनयही सहजपणे करण्यात यशस्वी झालेल्या जॅान अब्राहमची पावलंही मराठी सिनेसृष्टीकडे वळली आहेत. ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाच्या निर्मितीतून जाॅनने मराठीत इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आहे.


दिग्गजांचा वारसा

सुभाष घई, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, अजय देवगण, रोहित शेट्टी, संजय लीला भन्साळी या हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गजांच्या पावलावर पाऊल टाकत जॅाननेही मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे. स्वप्ना वाघमारे जोशी यांनी जॅानची निर्मिती असलेल्या पहिल्या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ८०च्या दशकात मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या 'सविता दामोदर परांजपे' या नाटकावरून हा सिनेमा बनवण्यात आला आहे.



 

एक थरारनाट्य

१९८५ मध्ये रंगभूमीवर आलेल्या 'सविता दामोदर परांजपे' या नाटकाने रसिकांच्या मनाचा थरकाप उडवला होता. शेखर ताम्हाणे यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात राजन ताम्हाणे आणि रीमा लागू यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. अभिनय, दिग्दर्शन, सादरीकरण, पार्श्वसंगीत आणि अप्रतिम संहिता असलेलं हे नाटक त्या काळातील रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं.



स्वप्नाचं दिग्दर्शन

जे. ए. एन्टरटेन्मेंट आणि पॅनोरमा स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केलं आहे. स्वप्ना यांनी यापूर्वी 'मितवा', 'फुगे' आणि 'तुला कळणार नाही' या सिनेमांचं यशस्वी दिग्दर्शन केलं आहे. आता 'सविता दामोदर परांजपे'च्या रूपात त्या एक नवा सिनेमा घेऊन आल्या आहेत.


सुबोधची मुख्य भूमिका

मराठी प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सुबोध भावे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्या जोडीला तृप्ती तोरडमल आणि राकेश वसिष्ठ हे कलाकार आहेत. शिरीष लाटकर यांनी या सिनेमाचं लेखन केलं आहे. हा सिनेमा ३१ आॅगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा-

पहिल्यांदाच केलं मोटिव्हेशनल साँग- चिनार-महेश

...आणि सुबोध बनला ‘काशिनाथ घाणेकर’



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा