Advertisement

...आणि सुबोध बनला ‘काशिनाथ घाणेकर’


...आणि सुबोध बनला ‘काशिनाथ घाणेकर’
SHARES

बालगंधर्व आणि लोकमान्य टिळकांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा पडद्यावर जीवंत केल्यानंतर अभिनेता सुबोध भावे आता डाॅ. काशिनाथ घाणेकरांचं व्यक्तिचित्र रुपेरी पडद्यावर रेखाटणार आहे.

ज्यांच्या नावावर तिकीटबारीवर हाउसफुल्लचं बोर्ड लागत होतं... ज्या नावाने मराठी रसिकांना अक्षरश: वेड लावलं होतं... ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृहे दणाणून जात होती, असे मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर रुपेरी पडद्याच्या माध्यमातून भेटणार आहेत. सुबोध भावे त्यांची भूमिका साकारणार आहे.


जादुई अभिनयाची मोहिनी

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचं योगदान अतुलनीय आहे.  यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीला वैभवाचे दिवस आणले. अनेक तरुण अभिनेत्यांसाठी ते प्रेरणादायी ठरले. प्रभावशाली संवादफेक, जरब बसणारे डोळे आणि विशिष्ट पद्धतीने बोलण्याची त्यांची शैली अद्वितीय होती. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘गारंबीचा बापू’, ‘आनंदी गोपाळ’, ‘शितू’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, ‘मधुमंजिरी’ या आणि अशा अनेक नाटकांमधील त्यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या.


दिवाळीच्या मुहूर्तावर होणार प्रदर्शित

वायकॉम १८ मोशन पिक्चर्स दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ‘आणि.... काशिनाथ घाणेकर’ या सिनेमाद्वारे घाणेकरांना रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहे. हे जबरदस्त व्यक्तिमत्व पडद्यावर आणणार आहे अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे. त्याच्या जोडीला सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा ७ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


उदय आणि अस्त

१९६० च्या दशकावर आधारीत असलेल्या ‘आणि काशिनाथ घाणेकर’ मध्ये डॅा. घाणेकरांचा उदय आणि अस्त दाखविण्यात येणार आहे, त्यांनी मराठी रंगभूमीचा चेहेरामोहरा लीलया बदलून टाकला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केलं आहे.



हेही वाचा - 

लंडनमध्ये कंगनाचं चक्रासन

स्त्रियांच्या समस्येसाठी ‘पळापळ’ करणार प्रदीप पटवर्धन !



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा