Advertisement

इंदर कुमारचा आत्महत्येचा व्हायरल व्हिडिओ; सत्य मात्र काहीतरी वेगळंच!

त्या व्हिडिओमध्ये इंदर कुमार दारू पीत असताना नैराश्यग्रस्त दिसत आहे. तसेच, आत्महत्या करण्यासंदर्भातही उल्लेख करत आहेत. त्यामुळे इंदर कुमारचा मृत्यू ह्रदयविकारामुळे झाला की आत्महत्या? असा प्रश्न निर्माण झाला होता. आता मात्र या व्हिडिओमागचं सत्य समोर आलं आहे.

इंदर कुमारचा आत्महत्येचा व्हायरल व्हिडिओ; सत्य मात्र काहीतरी वेगळंच!
SHARES

गेल्या काही दिवसांपासून दिवंगत बॉलिवुड अभिनेता इंदर कुमारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये इंदर कुमार दारू पीत असताना नैराश्यग्रस्त दिसत आहे. तसेच, आत्महत्या करण्यासंदर्भातही उल्लेख करत आहेत. त्यामुळे इंदर कुमारचा मृत्यू ह्रदयविकारामुळे झाला की आत्महत्या? असा प्रश्न निर्माण झाला होता. आता मात्र या व्हिडिओमागचं सत्य समोर आलं आहे.


इंदर कुमार मानसिकरित्या खूप खंबीर माणूस होता. तो आत्महत्या कधीच करू शकत नाही. जर तसं काही असतं, तर त्याचा अपघात झाला, तेव्हाच त्याने आत्महत्या केली असती. तेव्हा तब्बल २ वर्ष तो बेडरेस्टवरच होता. तो दारू पितच नव्हता, सिगारेटही दोनच प्यायचा. शिवाय, आपल्या मुलीसाठी तो सिगारेटही सोडणार होता.

पल्लवी, इंदर कुमारची पत्नी


फटी पडी है यार...

हा व्हिडिओ इंदर कुमारच्या एका चित्रपटातला एक सीन आहे. 'फटी पडी है यार' असं या चित्रपटाचं नाव असून हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. चित्रपटातील व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे इंदर कुमारच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचं पाहून त्याची पत्नी पल्लवीने यासंदर्भात सोमवारी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे.


इंदर कुमारचा व्हायरल व्हिडिओ हा 'फटी पडी है यार' चित्रपटातला आहे. हा सीन इंदर कुमारच्या मृत्यूच्या दीड वर्ष आधी शूट करण्यात आला होता. ज्यानी कुणी हा व्हिडिओ लीक केला असेल, त्याच्याविरोधात आम्ही सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करणार आहोत.

प्रेम गिरधानी, दिग्दर्शक

जुलै २०१७मध्ये इंदर कुमारचा ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता.



हेही वाचा

हिमांशू रॉय यांचा कॅन्सर नियंत्रणात होता, मग नक्की झालं काय?


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा