अभिनेता इंदर कुमार यांचे निधन


  • अभिनेता इंदर कुमार यांचे निधन
SHARE

बॉलिवूड अभिनेता इंदर कुमार यांचे हृदय विकाराच्या झटक्याने गुरुवार रात्री 12.30 वाजताच्या सुमारास निधन झाले. ते 45 वर्षांचे होते. अंधेरीतल्या चार बंगला येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

90 च्या दशकात त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांनी अनेक गाजलेल्या हिंदी सिनेमांत अभिनय केला आहे. 'खिलाडीयों का खिलाडी', 'तिरछी टोपीवाले' आणि 'तुमको ना भूल पाएंगे' या सिनेमांसह छोट्या पडद्यावरही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. 'वॉन्टेड' या सिनेमात त्यांनी अभिनेता सलमानच्या भावाची भूमिका साकारली होती. खरंतर सलमान खान आणि इंदर कुमार यांच्यात घनिष्ट मैत्री होती.

'कुंवारा', 'गजगामिनी', 'माँ तुझे सलाम', 'हथियार' या सिनेमांतील त्यांच्या भूमिका विशेष ठरल्या. सध्या ते 'फटी पडी है यार' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. पण गुरुवारी रात्री ते त्यांच्या घरात बेशुद्धावस्थेत आढळले.

इंदर कुमार यांच्यावर काही वर्षांपूर्वी एका मॉडेलवर बलात्कार केल्याचा आरोप होता. त्यावेळी त्यांना अटकही झाली होती.हेही वाचा -

'अमर' चा अजरामर प्रवास

अभिनेत्री अश्विनी एकबोटे कालवश


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या