Advertisement

श्रेयस तळपदेनं कॅन्सरग्रस्त मुलांसोबत साजरा केला व्हॅलेंटाईन डे!


श्रेयस तळपदेनं कॅन्सरग्रस्त मुलांसोबत साजरा केला व्हॅलेंटाईन डे!
SHARES

कॅन्सर...नुसतं नाव जरी ऐकलं, तरी भल्या भल्यांच्या पोटात गोळा येतो. आणि हाच आजार जर लहान मुलांना झाला, तर त्यांच्या मनात काय होत असेल, याचा विचार न केलेलाच बरा! परळच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही गेलात, तर तुम्हाला अशी अनेक मुलं दिसतील, जी या भयंकर आजाराचा सामना करत आहेत.त्यांच्यासाठी गायली गाणी!

याच मुलांना धीर देण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक छोटंसं हास्य फुलवण्यासाठी अभिनेता श्रेयस तळपदेनं पुढाकार घेतला. व्हॅलेंटाईन डे प्रत्येक जण आपापल्या परीनं वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा करत असतो. बॉलिवुड म्हटलं तर हे 'साजरा करणं' अजूनच भव्यदिव्य होतं. पण श्रेयस तळपदेनं या दिवसाचं निमित्त साधून या कॅन्सरग्रस्त मुलांना भेट दिली. त्यांच्यासोबत वेळ घालवला. त्यांच्यासोबत खेळलाही!..आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं!

श्रेयस सकाळीच पत्नी दीप्तीसोबत टाटा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. या मुलांसोबत त्याने धमाल केली. केक कापला. त्यांना चॉकलेट दिलं आणि गाणी सुद्धा गायली! इतर कुणी व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करतं, हे माहीत नाही. त्यांच्या प्रयत्नांमुळे कुणाच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं, तेही माहीत नाही. पण श्रेयस तळपदेनं मात्र या मुलांच्या चेहऱ्यावर काही तासांसाठी का होईना, हास्य फुलवलं. याचं समाधान रूग्णालय प्रशासनासोबतच स्वत: श्रेयस तळपदे आणि दीप्ती तळपदे यांच्याही चेहऱ्यावर दिसत होतं.मला खूप आनंद झाला आहे. आज मी या मुलांसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा केला. या निमित्ताने माझ्या आतलं लहानसं मूलही जागं झालं. मी इथे पुन्हा येणार आहे. या मुलांना माझा 'गोलमाल अगेन' चित्रपट दाखवणार आहे.

श्रेयस तळपदे, अभिनेताहेही वाचा

व्यंगालाही दिलं आव्हान! त्यांच्या प्रेमाला दृष्टीची गरज भासलीच नाही!


संबंधित विषय
Advertisement