Advertisement

वरुण म्हणतोय, 'माझे काय चुकलं?'


वरुण म्हणतोय, 'माझे काय चुकलं?'
SHARES

करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या वरूण धवनची तुलना कधी गोविंदासोबत केली जाते, तर कधी सलमान खानसोबत. पण याचा वरूणवर कधीच परिणाम नाही झाला. बॉक्स ऑफिसवर त्याचे चित्रपट तुफान गाजत आहेत. 'स्टुडंट्स ऑफ द इयर' या चित्रपटातून वरूणने करिअरला सुरुवात केली. त्यानंतर 'हम्पटी शर्मा की दुल्हनिया', 'बदलापूर', 'एबीसीडी २' अशा अनेक चित्रपटांमध्ये वेगळ्या धाटणीच्या भूमिका वरुणने साकारल्या आहेत. दिग्दर्शक आणि निर्माता डेविड धवन यांचा मुलगा जरी असला, तरी त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.



आता वरूण धवनचा 'जुडवा-२' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'जुडवा २' हा सलमानच्या 'जुडवा' चित्रपटाचा रिमेक आहे. अर्थात या चित्रपटात वरुण धवनचा डबल रोल पाहायला मिळणार आहे. यासोबतच तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नांडिस पण झळकणार आहेत. 'जुडवा-२' चित्रपटाच्या निमित्ताने वरूण धवनने 'मुंबई लाइव्ह'शी केलेली ही खास बातचित..


'जुडवा-२' चित्रपटाचील भूमिका करणे किती आव्हानात्मक होते?

थोडे आव्हानात्मक तर आहेच. कारण २० वर्षांनंतर 'जुडवा-२' बनवण्यात येत आहे. यातील काही सीन्स तुम्हाला जुन्या 'जुडवा' चित्रपटाची आठवण करून देतील. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवू इच्छितो. यातून कोणताच सामाजिक संदेश देण्याचा आमचा प्रयत्न नाही. हा फक्त एक मनोरंजनात्मक चित्रपट आहे. तुम्ही चित्रपटगृहातून बाहेर याल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर फक्त हसू असेल.


'जुडवा-२' चित्रपट साकारताना काही दबाव जाणवला का?

'जुडवा' चित्रपटाच्या पहिल्या भागात सलमान खानने प्रमुख भूमिका साकारली आहे. त्यामुळे माझ्यासाठी 'जुडवा-२'मध्ये भूमिका साकारणे आवहानात्मक होते. सर्वांच्या माझ्याकडून आणि चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे प्रत्येकजण तो दबाव माझ्यावर टाकण्याचा प्रयत्न करत आहे. पणचित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे मी आता दबाव घेऊन काय करणार? मला जे करायचे होते, ते मी चित्रीकरणादरम्यान केले आहे.


'जुडवा-२' चित्रपटाचे प्रमोशन कसे करणार?

परेश रावल यांनी यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसंदर्भात एक वक्तव्य केले होते. 'हल्ली अभिनेते चित्रपटाचे खूप प्रमोशन करतात. कदाचित अभिनेत्यांना चित्रपट चालेल की नाही याची भिती असते. पण जर स्टोरी चांगली असेल तर प्रेक्षक नक्कीच चित्रपट बघायला जातो. त्यासाठी प्रमोशनची गरज नसते.'परेश रावल यांनी दिलेला हा सल्ला मी मनावर घेतला आहे. त्यामुळे या चित्रपटाचे जास्त प्रमोशन  केले नाही.

  


सलमानने 'जुडवा-२' चित्रपटासाठी काही टिप्स दिल्या का?

नाही. सलमान खानने कोणत्याही टिप्स दिल्या नाहीत. फक्त 'टन टना टन टनटन टारा' या गाण्याचे बोल बदलण्यास मनाई केली. तसेच त्यांनी मला एक बॅग पाठवली होती. त्या बॅगेत 'जुडवा' चित्रपटाच्या पहिल्या भागात राजाने घातलेल्या जिन्स होत्या. याच जिन्स मी राजाची भूमिका साकारताना घातल्या आहेत.  


तापसी पन्नू आणि जॅकलिनसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

तापसी आणि जॅकलिन या दोघींना बॉलिवूडचा तगडा अनुभव आहे. तापसीने अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. यासोबतच साउथच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर जॅकलिनने देखील सलमान आणि अक्षयसोबत चित्रपट केले आहेत. दोघींनी नेहमी मला प्रोत्साहन दिले आहेटेंशन न घेता मजा, मस्ती करत कसे काम करायचे? हे या दोघींकडून शिकण्यासारखे आहे.



राजा आणि प्रेम या भूमिकांमध्ये कोणती भूमिका आव्हानात्मक होती?

राजाचा जन्म मुंबईतला आहे. मुंबईतच तो लहानाचा मोठा झाला. माझ्यासाठी राजाची भूमिका साकारणे सोपे होते. कारण मी मुळात मुंबईचाच आहे. पण प्रेमची भूमिका जरा हटके आहे. आजपर्यंत अशी भूमिका कुणीच केली नसेल.   


तुमची तुलना नेहमी दुसऱ्या कलाकारांसोबत केली जाते..

माझी तुलना नेहमी दुसऱ्या कलाकारांसोबत केली जाते हे मला माहीत आहे. पण याचा माझ्यावर काहीएक परिणाम झाला नाही. कोण काय बोलतो, याचा मला काही फरक पडत नाही.



वडिलांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

एका यशस्वी दिग्दर्शकासोबत काम केले यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजतो. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अनेकदा आमचे काही गोष्टींवरून वाद झाले. कधी कधी तर मी त्यांचा ओरडा देखील खाल्ला आहे. पण त्यांना जास्त अनुभव आहे. मला कोणता सीन जमत नसेल, तर ते त्यासाठी १० सोप्या टिप्स द्यायचे. त्यामुळे नक्कीच मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.  


मराठी चित्रपट तुम्ही पाहिले आहेत का?

मी मराठी चित्रपट देखील पाहतो. वेंटिलेटर, नटसम्राट असे अनेक मराठी चित्रपट मी पाहिले आहेत. मराठीत माझी आवडती लाइन आहे, 'माझे काय चुकले?’मराठी चित्रपटात मला काम करायला नक्की आवडेल.



हेही वाचा

'हा' अभिनेता साकारणार कपिल देव यांची भूमिका!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा