Advertisement

'जुडवा २' म्हणजे नव्या बाटलीत जुनी वाइन!


'जुडवा २' म्हणजे नव्या बाटलीत जुनी वाइन!
SHARES

डेविड धवनचा 'जुडवा २' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. 'जुडवा' चित्रपटाचा हा सिक्वल आहे. या चित्रपटात वरूण धवनने राजा आणि प्रेम अशा दोन भूमिका साकारल्या आहेत. तर प्रेमच्या गर्लफ्रेंडची भूमिका तापसी पन्नू (सायरा) आणि राजाच्या गर्लफ्रेंडची भूमिका जॅकलिन फर्नांडिस(अलिश्का शेख)ने साकारली आहे

एक आई जुळ्या मुलांना जन्म देते. पण त्या रात्री अशी एक घटना घडते, की दोघांपैकी एक मुलगा आईपासून दुरावतो. वडिलांसोबत असलेल्या वैरापोटी एक गुंड दोन मुलांपैकी एका मुलाला घेऊन पळून जातो. ज्या मुलाला घेऊन गुंड पळून जातो, तो मुंबईच्या वर्सोवासारख्या परिसरात लहानाचा मोठा होतो. त्याचे नाव राजा असते. तर दुसरा मुलगा प्रेम आई-वडिलांसोबत लंडनला राहत असतो. राजाचे राहणीमान आणि बोलण्याची स्टाइल टपोरी मुलांसारखी असते. मुंबईतल्या एका मोठ्या गुंडासोबत राजाची शत्रुत्व होते. त्या गुंडाच्या भितीने राजा आणि त्याचा मित्र नंदू लंडनला पळून जातात. लंडनला जाणाऱ्या विमानामध्ये राजाची ओळख अलिश्का(जॅकलिन फर्नांडिस)शी होते. लंडनला गेल्यावर राजा त्याच्या भावाला कसा भेटतो? हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट तुम्हाला पाहावा लागेल.

रुण धवन हा गोविंदा आणि सलमान खानची कॉपी करतो, असे नेहमीच बोलले जाते. या चित्रपटात त्याने फक्त गोविंदा, सलमान खानसोबतच शाहरुख खान आणि चंकी पांडेची देखील कॉपी केली आहे. 'अम्मीजान कहा करती थी...' हा डायलॉग एक-दोन वेळा ऐकायला काही वाटत नाही. पण वारंवार एकच डायलॉग ऐकणे थोडे कंटाळवाणे आहे. चित्रपटातील प्रेमची भूमिका वास्तविक आणि अधिक दमदार वाटते. तापसी पन्नूबद्दल सांगायचे झाले, तर तापसीचा हा पहिला कॉमेडी चित्रपट आहे. तापसीने यापूर्वी गंभीर भूमिका साकारल्या आहेत. पण या चित्रपटात प्रेक्षकांना तिची मजेशीर बाजू देखील पाहायला मिळाली. शिवाय तिच्या बोल्ड अंदाजाने अनेकांचे लक्ष आकर्षित केले. या चित्रपटात सलमान खान एका मिनिटासाठी येतो, पण डबल धमाल करतो. चित्रपटातील गाणी तर पहिल्यापासूनच सुपरहिट आहेत. 'उंची है बिल्डिंग' आणि 'टन टना टन टनटनटारा' ही गाणी पहिल्या जुडवा चित्रपटातीलच आहेत. एकूणच चित्रपट वन टाईम वॉच नक्कीच आहे!

  


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement