Advertisement

शमिता शेट्टी बनणार ‘खतरों के खिलाडी’


शमिता शेट्टी बनणार ‘खतरों के खिलाडी’
SHARES

‘मोहब्बतें’ सिनेमामध्ये ग्लॅमडॅालच्या रूपात बॅालिवूडमध्ये दाखल झाल्यानंतर अभिनेत्री शमिता शेट्टीनं तशाच पद्धतीच्या भूमिका साकारल्या. मात्र शमिता आता ‘रफ अँड टफ’ रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्ये शमिता दाखल होणार असून सध्या ती अर्जेंटिनात या शोच्या चित्रिकरणात व्यग्र अाहे.


बाॅलिवूडमध्ये फ्लाॅप

‘मोहब्बतें’ या पदार्पणाच्या सिनेमाखेरीज शमिताचा कोणताही सिनेमा विशेष उल्लेखनीय ठरला नाही. मोठ्या पडद्याकडून छोट्या पडद्याकडे वळताना शमिता थेट ‘बिग बॅास’च्या तिसऱ्या पर्वात झळकली. तिथेही तिची डाळ शिजली नाही. ‘झलक दिखला जा’ शोच्या आठव्या पर्वात दीपक सिंगसोबत तिनं तिसरा क्रमांक पटकावला. आता ती अर्जेंटिनामध्ये ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोचं चित्रीकरण करण्यात व्यग्र आहे.

चित्तथरारक स्टंट करणार

अॅक्शन-थ्रीलर रिअॅलिटी शो अशी ख्याती असलेल्या ‘खतरों के खिलाडी’मध्ये शमिता चित्तथरारक स्टंट्स करताना दिसणार अाहे. गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूमुळे आजारी असलेली शमिता काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण करून अर्जेंटिनाला रवाना झाली आहे.


भूमिकेकडे लक्ष

आजारपणामुळे माघार न घेता शमिता मोठ्या जिद्दीने ‘खतरों के खिलाडी’च्या चित्रीकरणाकरता पोहोचल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने योग्य उपचार आणि विश्रांती घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे शमिता आता ‘खतरों के खिलाडी’मध्ये कोणकोणती दिव्य पार करणार हे पाहण्याची उत्सुकता लागली आहे.


अांतरराष्ट्रीय सिनेमातही झळकणार

‘खतरों के खिलाडी’सोबतच शमिता एका इंटरनॅशनल सिनेमातही काम करणार आहे. ‘द टेनंट’ असं शीर्षक असलेल्या या सिनेमात शमिता ही मीरा नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. एका मध्यमवर्गीय गृहनिर्माण सोसायटीतील एक स्त्री कशाप्रकारे आंदोलनासाठी कारणभूत ठरते, हे या सिनेमात पाहायला मिळणार अाहे.


हेही वाचा -

मांजरेकरांच्या सिनेमात सोनल चौहान

शाहरुख-रितेशच्या लढतीला अजय-अतुलचा बँडबाजा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा