डॅडी कुणाल खेमूचे लाडक्या इनायासोबत फोटोसेशन!


SHARE

सोहा अली खाननं आपल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरूवात केली आहे. कुणाल आणि तिची चिमुकली इनाया नौमी खेमुचा फोटो सोहानं नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोत कुणालनं इनायाला उचलून घेतलं आहे. यावेळी वडील आणि मुलीचा हा सुरेख क्षण सोहानं कॅमेऱ्यात कैद केला.
Bliss ❤️

A post shared by Soha (@sakpataudi) onकुणाल खेमू सध्या बाबा बनल्याचा अनुभव घेत आहे. कुणालचा 'गोलमाल अगेन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कुणाल व्यस्त असला तरी बाबा म्हणून तो त्याची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत आहे.

२९ सप्टेंबरला ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये सोहा अली खाननं मुलीला जन्म दिला. ही गोड बातमी कुणालनं आपल्या ट्वीटर अकाऊंटवर चाहत्यांना दिली होती.सोहा चित्रपटात पुनरागमन करण्यास सज्ज?

एका चिमुकलीला जन्म दिल्यानंतर सोहा पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. सोहा अली खान तिग्मांशू धुलियाच्या 'साहेब बिवी आणि गँगस्टर ३' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. याबाबत अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण 'साहेब बिवी और गँगस्टर' ३ या चित्रपटात संजय दत्तसुद्धा असणार आहे, असं बोललं जातंय. वास्तव, हत्यार अशा चित्रपटात संजय दत्तनं गँगस्टरची भूमिका साकारली आहे. त्यामुळे नक्कीच या चित्रपटात संजू बाबाची गँगस्टरची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.हेही वाचा

'रेखा' नावाचा 'चित्रपट'!


संबंधित विषय