Advertisement

कोरोना काळातील मदतीमुळे सोनी सूद अडचणीत, हायकोर्टानं उपस्थित केले प्रश्न

सेलिब्रिटींकडून मिळणाऱ्या मदतीची शहनिशा होतेय का?, त्यांच्याद्वारे मिळणारी औषधं ही योग्य मार्गानं मिळविण्यात आली आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कोरोना काळातील मदतीमुळे सोनी सूद अडचणीत, हायकोर्टानं उपस्थित केले प्रश्न
SHARES

बुधावारी मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) सेलिब्रिटींकडून मिळणाऱ्या मदतीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. सेलिब्रिटींकडून मिळणाऱ्या मदतीची शहनिशा होतेय का?, त्यांच्याद्वारे मिळणारी औषधं ही योग्य मार्गानं मिळविण्यात आली आहेत का? तसंच ती बनावट तर नाहीत ना, त्याबाबत खातरजमा करण्यात येते का? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

संकटकाळात लोकांशी संपर्क साधून काहीजण देवदूतासारखे वावरत आहेत. उद्या कोणीही उठेल आणि सोशल मीडियावर मदतीचं आवाहन करेल यामुळे सरकारविरोधात सर्व सामान्यांमध्ये गैरसमज पसरेल, हे योग्य नाही याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा यावेळी खंडपीठानं व्यक्त केली, सोबतच सुनावणी २५ जूनपर्यंत तहकूब केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील रूग्णालयातील खाटांची कमी संख्या, रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनचा अपुरा साठा आणि काळी बुरशी अशा समस्यांवर बोट ठेवत स्नेहा मरजादी यांनी अ‍ॅड. अर्शिल शहा यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

या याचिकांवर बुधवारी न्यायमूर्ती एस. पी. देशमुख आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. मागील सुनावणीदरम्यान आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) आणि अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) सोशल मीडियाच्या माध्यमातून गरजूंना 'रेमडेसिवीर' औषधांची मदत केल्याबाबतचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

त्यावर झिशान सिद्दीकीकडून बीडीआर या ट्रस्टमार्फत औषधांचा पुरवठा करण्यात आला होता. त्या ट्रस्टचे विश्वस्त धीर शहा यांच्याविरोधात अवैधरित्या औषधांचा पुरवठ्या केल्याप्रकरणी माझगाव इथल्या दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी तक्रार करण्यात आली आहे.

तसंच ट्रस्टला रेमडेसिवीरचा पुरवणाऱ्या फार्मास्युटिकल्सच्या चार संचालकांविरोधातही फौजदारी तक्रार दाखल केल्याची माहिती महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी कोर्टाला दिली. मात्र, आमदार झिशान सिद्दीकीविरोधात तूर्तास कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

तर दुसरीकडे, अभिनेता सोनू सुदला एका साखळी प्रक्रियेमार्फत औषध पुरवठा करण्यात आला होता. त्यातील शेवटचा दुवा हे गोरेगावमधील लाईफलाईन मेडिकल केअर रुग्णालयातील दुकान आहे. त्यांना 'सिप्ला' कंपनीच्या भिवंडी गोदामातून हा साठा मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. हा साठा सरकारच्या अपरोक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला असून त्याची चौकशी सुरू असल्याचंही कुंभकोणी यांनी कोर्टाला सांगितलं.हेही वाचा

कोविड रिलिफ फंडसाठी चिंगारीचा पुढाकार, 'वर्ल्ड म्युझिक डे कॉन्सर्ट'चे आयोजन

अजिंक्य देव यांचे छोट्या पडद्यावर कमबॅक, साकारणार बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा