सुभाष घईंची व्हिसलिंग वुड्स चौकशीच्या फेऱ्यात!

 Mumbai
सुभाष घईंची व्हिसलिंग वुड्स चौकशीच्या फेऱ्यात!

हिंदी चित्रपटसृष्टीत 'शोमॅन' नावाने प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ निर्माता, दिग्दर्शक सुभाष घई यांची व्हिसलिंग वुड्स ही प्रशिक्षण संस्था पुन्हा एकदा वादात अडकली आहे. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे एका विद्यार्थिनीने संस्थेत प्रवेश घेतल्याप्रकरणी बोरीवली न्यायालयाने संस्थेची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.


बनावट प्रमाणपत्राद्वारे प्रवेश

तक्रारदार ओम प्रकाश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत राहणाऱ्या नेहा रघुवंशी या विद्यार्थिनीने बीएच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतल्याची तक्रार 2014 मध्ये आली होती.


माहिती अधिकारात उघड

दिल्लीतील संबंधित विद्यापीठाकडून माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मिळवण्यात आली. त्यात या विद्यार्थिनीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झाले. या प्रकाराची माहिती तक्रारदाराने व्हिसलिंग वुड्सलादेखील दिली.पोलिसांकडून दुर्लक्ष

त्यावर व्हिसलिंग वुड्सकडून उत्तर आले की, आम्ही केवळ विद्यार्थ्यांकडून प्रमाणपत्राची साक्षांकित प्रतच स्वीकारतो. त्यानंतर तक्रारकर्त्यांनी आरे पोलिसांकडे जात तिथेही तक्रार नोंदवली.


न्यायालयात याचिका

परंतु आरे पोलिसांनी याप्रकरणी काहीच हालचाल न केल्याने जुलै 2014 मध्ये तक्रारदारांनी बोरीवली न्यायालयात सुभाष घई आणि व्हिसलिंग वुड्सविरोधात याचिका दाखल केली.

यासंदर्भात वकील क्षितीज मेहता म्हणाले की, आमच्या याचिकेची दखल घेत न्यायालयाने 3 जुलै रोजी सीआरपीसी 202 अंतर्गत पोलिसांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिस तपास करुन त्यासंबंधीचा अहवाल न्यायालयाला सोपवतील.


सुभाष घईंचा जुना वाद

यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी गोरेगावच्या फिल्मसिटीतील साडेपाच एकर जमीन घई यांच्या 'मुक्ता आर्ट्स' संस्थेला दिली होती. ही जमीन नियमबाह्य पद्धतीने दिल्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते.
हे देखील वाचा -

सायबर गुन्हे रोखण्यासाठी 'सिंघम'चा पुढाकार


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Loading Comments