Advertisement

कान्स फिल्म फेस्टिवलला कोरोनाचा फटका, तारीख पुढे ढकलली

जगातील सर्वात मोठा फिल्म फेस्टिवल्सपैकी एक लोकप्रिय फेस्टिवल असलेला कान्स फिल्म फेस्टिवल पुढे ढकलण्यात आला आहे.

कान्स फिल्म फेस्टिवलला कोरोनाचा फटका, तारीख पुढे ढकलली
SHARES

कान्स फिल्म फेस्टिवलला आता  कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. जगातील सर्वात मोठा फिल्म फेस्टिवल्सपैकी एक लोकप्रिय फेस्टिवल असलेला कान्स फिल्म  फेस्टिवल पुढे ढकलण्यात आला आहे. १२ मे ते २३ मे या काळात  ७३ वा कान्स फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आला होतं. पण जगभरात कोरोनाचा फैलाव झाल्याने  या फेस्टिवलची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 

जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरूवातीला कान्स फिल्म फेस्टिवल होण्याची शक्यता आहे. कान्स फिल्म फेस्टिवलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून १९ मार्च रोजी याबाबत ट्वीट करण्यात आलं आहे. ट्वीटनुसार,  फ्रान्स आणि जगभरात सुरू असलेल्या या परिस्थितीमुळे तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 

फेस्टिवल साजरा करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. सगळ्या संभाव्य गोष्टी तपासून पाहिल्या पण ते शक्य नाही. यामुळे हा फिल्म फेस्टिवल पुढे ढकलणं सर्वात महत्वाचं आहे. फ्रेंच आणि इतर देशातील लोकांची परिस्थिती पाहता हे पाऊल उचलणं सर्वात महत्वाचं ठरणार आहे. हेही वाचा -

ICICI बँक आता तुमच्या घरी

कोरोनामुळे 10 हजार कर्मचाऱ्यांना पाठवले बिनपगारी रजेवर
संबंधित विषय
Advertisement