'हाफ गर्लफ्रेण्ड'चे पोस्टर प्रदर्शित

 Mumbai
'हाफ गर्लफ्रेण्ड'चे पोस्टर प्रदर्शित
Mumbai  -  

मुंबई - '‘हाफ गर्लफ्रेण्ड’ सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांची प्रमुख भुमिका असलेला हा सिनेमा 19 मे रोजी प्रदर्शित होत आहे. श्रद्धा-अर्जुन पावसात एकमेकांचे हात पकडून रोमँटिक अंदाजात या पोस्टरमध्ये दिसत आहेत. 

दोस्त से ज्यादा, गर्लफ्रेंड से कम, अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ या कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे. मोहित सूरीने ‘हाफ गर्लफ्रेण्ड’चं दिग्दर्शन केले आहे.मोहित सूरीने श्रद्धासोबत ‘आशिकी 2’ सारखा सुपरहिट सिनेमा केला आहे. हाफ गर्लफ्रेण्डमध्ये अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत असून सुमारे दोन वर्षांनंतर त्याचा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

Loading Comments